पुण्यात सीएमईमध्ये सरावादरम्यान अपघात, दोन जवानांचा मृत्यू

पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (CME Pune) मध्ये सरावादरम्यान झालेल्या भीषण अपघातात भारतीय सेनेच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:43 PM, 26 Dec 2019
पुण्यात सीएमईमध्ये सरावादरम्यान अपघात, दोन जवानांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (CME Pune) मध्ये सरावादरम्यान झालेल्या भीषण अपघातात भारतीय सेनेच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खडकी येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये जेसीओ दर्जाच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. CME हे भारतीय सेनेच्या कॉर्प्स ऑफ इंजीनियर्सच्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ओळखलं जातं. पुण्याच्या दापोडी येथे हे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे (Two Army Jawan Died In CME Accident).

रक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी (26 डिसेंबर)घडली. या महाविद्यालयातील जवानांचं एक युनिट केबल्सच्या सहाय्याने दोन टॉवरदरम्यान उभारण्यात आलेला मोबाईल पूल उघडण्याचं प्रशिक्षण घेत होते. याचा उपयोग जवानांना हे कठीण भागात अडथळ्यांचा अंदाज घेण्यासाठी होतो. हे प्रशिक्षण घेत असताना गुरुवारी दुपारी दोनपैकी एक टॉवर अचानक कोसळला. या भीषण अपघातात सात जवान टॉवरखाली आला. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला तर पाच जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृत जवानांपैकी एकाचे नाव संजीवन पी. के. आहे, ते केरळचे रहिवासी आहेत. तर दुसऱ्या जवानाचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही.

युद्ध काळात लष्करासाठी मार्ग तयार करण्यासाठी पूल उभारणे आणि इतर अभियांत्रिकी कामे ही CME मध्ये जवानांना शिकवली जातात.