Pune Water Supply | पुण्याचा पाणीपुरवठा कमी करण्याचा निर्णय, महापौर मोहोळ यांंचा गंभीर आरोप, पाणी पेटणार ?

भामा आसखेड धरणातून हा पाणीपुरवठा कमी केला जाईल. या निर्णयामुळे आता पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी गंभीर टीका केली आहे. त्यांनी पुण्याचं पाणी कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केलाय.

Pune Water Supply | पुण्याचा पाणीपुरवठा कमी करण्याचा निर्णय, महापौर मोहोळ यांंचा गंभीर आरोप, पाणी पेटणार ?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 10:19 PM

पुणे : पुणे शहराचा पाणीपुरवठा 3 डिसेंबरपासून कमी केला जाणार आहे. भामा आसखेड धरणातून हा पाणीपुरवठा कमी केला जाईल. या निर्णयामुळे आता पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी गंभीर टीका केली आहे. त्यांनी पुण्याचं पाणी कमी करण्याचा हा डाव असल्याचा असल्याचं म्हटलंय.

पाणीपुरवठा कमी करु नये, पालकमंत्र्यांना विनंती

मिळालेल्या माहितीनुसार पाटबंधारे विभागाकडून उद्यापासून पुण्याचा पाणीपुरवठा कमी केला जाणार आहे. भामा आसखेड धरणातून दिवसाला 380 टीएमसी एवढा पाणीपुरवठा केला जातो तो आता कमी केला जाणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांसमोर पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीक केली आहे. भामा आसखेड धरणातून पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा कमी केला जाणार आहे, असा त्यांनी आरोप केलाय. तसेच हा पाणीपुरवठा कमी करु नये अशी विनंती त्यांनी पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली आहे. दरम्यान, महापौरांच्या या गंभीर आरोपामुळे पुण्यात पाणी पेटण्याची शक्यता आहे.

उजणी धरणाच्या पाण्यावरूनही राजकारण

दुसरीकडे हाच पाण्याचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातही पेटलेला आहे. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर चांगलेच राजकारण तापले होते. इंदापूरचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात त्यावेळी सोलापुरात अनेक आंदोलनंही करण्यात आली होती. सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींनीही याला मोठा विरोध केला होता. त्यानंतर 18 मे रोजी अखेर जयंत पाटील यांनी उजणी धऱणाचं पाणी कोणालाही दिलं जाणार नाही, असे सांगत शासन निर्णय रद्द केला होता.

इतर बातम्या :

महाविकास आघाडीच्या संसारात ममता बॅनर्जींकडून मिठाचा खडा; काँग्रेस नेते आक्रमक, तर शिवसेना, राष्ट्रवादीची सारवासारव!

diva dumping ground: नाकात दम आणणारा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड हटवला जाणार, 14 वर्षानंतर दिवेकरांची वनवासातून सुटका

Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?

Non Stop LIVE Update
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.