Weather Forecast: दिवाळीत पाऊस विचका करणार? कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता

Weather Alert | कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी 1 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत तीन ते चार दिवस, तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी 2 नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Weather Forecast: दिवाळीत पाऊस विचका करणार? कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 8:11 AM

पुणे: ऐन दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी 1 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत तीन ते चार दिवस, तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी 2 नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. (Rabi season sowing delayed) पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर काही जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरवातही झाली आहे. मात्र, पेरणी होताच पाऊस झाला तर पिक वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामातील कामे सुरळीत सुरु होती. अधिकचा पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये अद्यापही वाफसे नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील इतर राज्यांमध्येही पावसाची शक्यता

नोव्हेंबर महिन्यातील 2, 3 आणि 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. श्रीलंकेपासून 250 किमी अंतरावर चक्रीवादळ तयार होत आहे. त्या वादळामुळे देशातील सहा राज्यांमध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी होण्याच्या आगोदरच नुकसानीचे सावट निर्माण झाले आहे.

या पिकांची घ्या काळजी

खरीपातील कापूस वगळता अन्य पिकांची काढणी-मळणी ही झालेली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही शेतरकऱ्यांनी सोयाबीन वाळवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या काळाच्या दरम्यान सोयाबीन हे सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे तर कापसाच्या वेचणीची कामेही सुरु आहेत. यवतमाळसह महाराष्ट्रात कापूस वेचणी सुरु आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी एक वेचणी करुन घेणे गरजेचे आहे अन्यथा कापसाच्या बोंडाचे नुकसान होईल.

वाफसा झालेल्या क्षेत्रावर पेरणी गरजेची

सध्या पावसाने उघडीप दिल्याने हलक्या प्रतीच्या जमिनक्षेत्रावर वाफसा म्हणजे ते क्षेत्र हे पेरणीलायक झाले आहे. अशा क्षेत्रावर यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास वेळेची बचत होणार आहे. अन्यथा खरीपात पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या तर आता पावसामुळे रब्बीच्या पेरण्या ह्य लाबंणीवर पडणार आहेत. आगोदरच गतमहिन्यात झालेल्या पावसामुळे एका महिन्याचा उशिर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणाच अंदाज घेऊन पेरणी कामे उरकून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

VIDEO : पुण्यात पोलिसाला लाथाबुक्क्याने मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

‘पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा’, अजितदादांच्या नेतृत्वात कामाला लागण्याचे सुप्रिया सुळेंचे आदेश

कोळशाच्या टंचाईमुळे प्रकाशाचा सण अंधारात?, मंत्री दानवे म्हणतात, ‘काळजी करु नका, सगळं नियोजन झालंय!’

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.