पुणे, पिंपरी चिंचवडच्या सांडपाण्याने उजनी दूषित, कॅन्सरचा धोका!

सोलापूर : उजनी धरण हे सोलापूरसह पुणे, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदायिनी आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही या धरणामुळे सुटला. मात्र  धरणातील पाणी आता लोकांच्या जीवावर उठलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उजनी धरणातील पाण्यामुळे चक्क कॅन्सर होण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जलाशयावर अवलंबून असणाऱ्या 495 गावातील लोकांची झोप उडाली आहे. […]

पुणे, पिंपरी चिंचवडच्या सांडपाण्याने उजनी दूषित, कॅन्सरचा धोका!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

सोलापूर : उजनी धरण हे सोलापूरसह पुणे, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदायिनी आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही या धरणामुळे सुटला. मात्र  धरणातील पाणी आता लोकांच्या जीवावर उठलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उजनी धरणातील पाण्यामुळे चक्क कॅन्सर होण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जलाशयावर अवलंबून असणाऱ्या 495 गावातील लोकांची झोप उडाली आहे.

उजनी धरण पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा आणि बरोबरच आजूबाजूच्या 495 गावांची तहान या धरणामुळे भागवली जाते. हे धरण शेतीसाठी मोठं वरदान आहे. मात्र जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेलं धरण आता चक्क विषदायिनी बनलंय.

पाण्याच्या चाचणीत काय समोर आलं?

उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठाने शास्त्रशुद्ध अभ्यास केलाय. या चाचणीत पारा, शिसे आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले. यामुळे उजनी धरणातील पाणी सतत पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. यामुळे सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अहमनगर या चार  जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. उजनीचं हे पाणी मनुष्य आणि जनावरांनाही पिण्यायोग्य नाही,  असा निष्कर्ष निघाल्याने खळबळ उडाली आहे.

सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी उजनी धरणातील पाण्याचे आठ नमुने संकलित केले. एका गटाने पाण्याचे रासायनिक पृथकरण केले. पाण्यात डिझेल ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन, केमिकल ऑक्सिजन डिमांड, नायट्रेट आणि सल्फेट आढळून आले. उजनीतील जे पाणी 1981 ते 2000 पर्यंत पिण्यासाठी सर्वोत्तम मानलं जात होतं, तेच पाणी 2000 नंतर जलप्रदूषणामुळे अगदी स्पर्श करण्यासही धोकादायक ठरू लागलंय.

पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील सांडपाणी, तसेच पुणे ते दौंड पर्यंतच्या अनेक औद्योगिक प्रकल्पांतील रासायनिक सांडपाणी या ना त्या मार्गाने भीमेच्या पात्रातून थेट उजनीत येऊन मिसळत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या पाणी परीक्षणात पाण्यातील जैविक ऑक्सिजन (बीओडी) आणि रासायनिक ऑक्सिजन (सीओडी) ची मागणी अधिक वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

धरणक्षेत्रातील लोकांचं आरोग्य धोक्यात

सोलापूरसह अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक तालुके या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, कुर्डुवाडी, बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा या तालुक्यातील नदीकाठच्या शेकडो गावात शुद्धीकरण यंत्रणेशिवाय जसेच्या तसे पाणी पिण्याकरिता वापरण्यात येते. उजनी जलाशयालगतच्या सुमारे 495 गावातील लोक गेल्या कित्येक वर्षांपासून हे पाणी जसेच्या तसे पित आहेत.

या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी परिसरातील नागरिकांना पोटाच्या विकारांच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या दूषित पाण्यामुळे माशांच्या शेकडो जाती नामशेष झाल्या. शेतीला पाणी दिल्यामुळे जमिनीचे नापिकीचे प्रमाण वरचेवर वाढत चालले आहे.  त्यामुळे उजनीतील पाणी पिणाऱ्यांची झोप उडाली आहे.

शास्त्रीयदृष्ट्या नदीच्या पाण्याचा बीओडी प्रतिलिटर 6 ते 20 मिलिग्रॅम असणं गरजेचं असतं. पण प्रत्यक्षात तो उजनीच्या पाण्याचा बीओडी 35 ते 200 मिलिग्रॅमपर्यंत वाढल्याचं आढळून आलं आहे. तर रासायनिक ऑक्सिजन सीओडी  निर्देशांकही 75 ते 200 मिलिग्रॅमपर्यंत वाढल्याचं आढळलंय आणि पाण्यातील मिसळलेले हे पदार्थ पाहता कॅन्सर होण्याची दाट शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. याच कारणामुळे सोलापूर जिल्ह्यात कर्करोगाचं प्रमाण वाढल्याचं सांगण्यात येतंय. यावर उपाययोजना करण्यात आली नाही तर येत्या काही वर्षात मानवी जीवन धोक्यात असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

माशांच्या अनेक जाती नामशेष

उजनीतील पाण्याबाबत याआधी अनेक जलअभ्यासकांनी वारंवार आवाज उठविला होता. पुणे शहरातील सांडपाणी, टाकाऊ पदार्थ, रासायनिक घटक, घाण, मैला, हे सगळे उजनी धरणात मिसळते. मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणाबाबतचा सखोल अभ्यास डेक्कन इको लॅब या संस्थेचे डॉ. संदीप जोशी यांनी केला. दर आठवड्याला पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले. त्यांच्या निष्कर्षानुसार मुळा- मुठा ही नदी अति प्रदूषित नदी प्रवर्गामध्ये मोडते हे सिद्ध झालं आणि याच नदीचे पाणी उजनीत थेट येऊन मिसळत आहे. पाणी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने कसलीच दखल घेतली नाही. यामुळे पाण्यातील अनेक वेळा मासे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर  अनेक माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. मात्र याबाबत कोणत्याच हालचाली करण्यात येत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.

उजनीत कुठून किती सांडपाणी येतं?

2016-17 केंद्रीय भूजल विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील नदीकाठची गावे, उद्योगातून 1239.63 दशलक्ष लिटर सांडपाणी रोज वेगवेगळ्या मार्गांनी भीमा नदीत येतं. त्यातील फक्त 697.71 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावर प्रक्रिया केली जाते. 541.92 एमएलडी सांडपाणी रोज भीमेत सोडलं जातं.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून रोज एक हजार एमएलडी पाणी सांडपाणी निर्माण होतं. नदीकाठच्या 10 नगरपालिका, तीन छावणी केंद्रे आणि पुणे जिल्ह्यातील 196 गावातून रोज 99 एमएलडी, तर नदीकाठच्या नऊ एमआयडीसीतून 112 एमएलडी रासायनिक सांडपाणी रोज भीमा नदीत मिसळतं. सात खाजगी उद्योगधंद्यातून 30 एमएलडी घाण पाणी सातत्याने मिसळत आहे.

या सर्व सांडपाण्यामुळे त्‍यातील रासायनिक घटकांमुळे भीमा नदी पर्यायाने उजनी धरण अती प्रदूषित पाण्याच्या यादीत आलं आहे. भीमा नदीच्या खोऱ्यावर उजनी धरणाची जोपासना होते. पुणे, भिगवण, इंदापूर इथल्या औद्योगिक वसाहतीतून दूषित पाणी धरणात येऊन मिळते.

आजूबाजूच्या शेतीला दिलेली खतं, कीटकनाशकं आणि मिश्रित पाणी धरणात येऊन धरणातील दूषित होतं. सध्या धरणात शिसे, पारा आणि अत्यंत घातक रासायनिक घटक अढळून आले आहेत.

धरणाच्या पाण्याचा आजवर झालेला हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहर आणि या गावांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात उजनीचं हे दूषित पाणी स्वच्छ करण्याची क्षमता नाही. त्यामुळे कॉलरा, मलेरिया आणि पचन क्षमता कमी होण्याचे प्रमाण वाढणार असल्याची शक्यता जरी या अहवालात मांडण्यात आल्या तरी अनेक प्रकारचे रोग लोकांना अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याची वरदायिनी विषदायिनी बनल्याचं समोर आलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.