रत्नागिरीत 7 अजगरांची एकाच ठिकाणी हत्या कशासाठी?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील फुरुस-फलसोंडा येथील जंगलात 7 अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या मृत अजगरांमध्ये 2 माद्यांचा समावेश असल्याचे उघड झाले असून हे कृत्य ग्रामस्थांनीचे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वनविभागाकडून कसून शोध सुरु आहे. वनविभागाने अज्ञातांवर गुन्हाही दाखल केला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि सर्पमित्रांनी फुरुस-फलसोंडा हे घटनास्थळ गाठून जमिनीत पुरलेले …

रत्नागिरीत 7 अजगरांची एकाच ठिकाणी हत्या कशासाठी?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील फुरुस-फलसोंडा येथील जंगलात 7 अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या मृत अजगरांमध्ये 2 माद्यांचा समावेश असल्याचे उघड झाले असून हे कृत्य ग्रामस्थांनीचे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वनविभागाकडून कसून शोध सुरु आहे. वनविभागाने अज्ञातांवर गुन्हाही दाखल केला आहे.

वनविभागाचे अधिकारी आणि सर्पमित्रांनी फुरुस-फलसोंडा हे घटनास्थळ गाठून जमिनीत पुरलेले मृत अजगर बाहेर काढले. अजगरांमध्ये 11 फुटाच्या दोन माद्या व साडेआठ ते 10 फुटाच्या 5 नरांचा समावेश आहे. खेड पशुवैद्यकीय कार्यालयात शवविच्छेदन केल्यानंतर दस्तुरीनजीक अजगरांची जाळून विल्हेवाट लावण्यात आली.

या प्रकरणी अज्ञात ग्रामस्थांवर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अजगरांना नेमके कोणी मारले, याचा वनविभागाकडून कसून शोध सुरु आहे.

बातमीचा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *