विखे पाटील भाजपचा छुपा नाही, जाहीर प्रचार करतायत : संग्राम जगताप

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचा उमेदवार असलेला त्यांचा मुलगा सुजयचा छुपा नाही, तर जाहीरपणे प्रचार करत असल्याचा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय. पण काहीही झालं तरी निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा दावाही संग्राम जगताप यांनी केला. संग्राम …

MLA sangram jagtap, विखे पाटील भाजपचा छुपा नाही, जाहीर प्रचार करतायत : संग्राम जगताप

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचा उमेदवार असलेला त्यांचा मुलगा सुजयचा छुपा नाही, तर जाहीरपणे प्रचार करत असल्याचा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय. पण काहीही झालं तरी निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा दावाही संग्राम जगताप यांनी केला.

संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संग्राम जगताप यांच्या घरी देवपूजा केल्यानंतर, औक्षण झाल्यानंतर ते घराबाहेर पडले. ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन शहरातील माळीवडा परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत संग्राम जगताप यांच्यासह अंकुश काकडे, आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे आणि जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीची सांगता करून संग्राम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे संग्राम जगताप यांनी कुटुंबासोबत नाही, तर शेतकरी दाम्पत्याच्या हाताने उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीला जमलेली गर्दी ही उत्स्फूर्त होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक मीच जिंकणार, असा दावा त्यांनी केला.

विखेंवर संग्राम जगताप काय म्हणाले?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *