नागपुरात येऊन राहुल गांधींची गडकरींवर एका शब्दानेही टीका नाही

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. विशेष म्हणजे त्यांनी नागपूरचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्यावर एका शब्दानेही टीका केली नाही. राहुल गांधी यांनी संपूर्ण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि काँग्रेस या निवडणुकीत कोणत्या आश्वासनांसह उतरणार आहे …

nagpur congress rally, नागपुरात येऊन राहुल गांधींची गडकरींवर एका शब्दानेही टीका नाही

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. विशेष म्हणजे त्यांनी नागपूरचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्यावर एका शब्दानेही टीका केली नाही. राहुल गांधी यांनी संपूर्ण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि काँग्रेस या निवडणुकीत कोणत्या आश्वासनांसह उतरणार आहे याविषयी माहिती दिली.

राहुल गांधी आणि नितीन गडकरी राजपथावर शेजारी बसलेले असतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दोघांनी काय चर्चा केली असेल याविषयी अंदाजही लावले जात होते. विशेष म्हणजे संसदेत नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करत यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टाळ्या वाजवून दाद दिली होती. नितीन गडकरींनी त्यांच्या कामाविषयी माहिती दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही टाळ्या वाजवून दाद दिली.

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी नागपूरची लढत प्रतिष्ठेची केली आहे. भाजपमध्ये असताना ते भंडारा-गोंदियातून निवडून आले होते. पण खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नितीन गडकरींविरोधात लढणार असल्याचं त्यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं. राहुल गांधींनी नाना पटोलेंसाठी सभाही घेतली, पण त्यात गडकरींवर एक शब्दही काढला नाही.

दरम्यान, राहुल गांधींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल पुन्हा माहिती दिली. शिवाय मोदींनी माझ्यासोबत 15 मिनिटे चर्चा करावी, असं आव्हान पुन्हा एकदा दिलं.

UNCUT SPEECH : राहुल गांधी यांचं संपूर्ण भाषण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *