विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीनंतर राहुल गांधी पहिल्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विरोधीपक्ष नेते झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा महत्त्वाचा दौरा असणार आहे.

विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीनंतर राहुल गांधी पहिल्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 10:28 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले असतानाच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण महर्षी महाराष्ट्राचे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि स्मारकाचं अनावरण करण्यासाठी राहुल गांधी सांगली जिल्ह्यात येत आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार असून महाविकास आघाडीकडून पश्चिम महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शनही केलं जाणार आहे.

कैलासवासी पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असून पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच अनावरण हा सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असून राहुल यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीही राहुल गांधी यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार असून काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार, सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित असणार आहेत.

सांगलीला जाण्यापूर्वी राहुल गांधी हे नांदेडमध्ये जाऊन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ते नांदेड मधून थेट कोल्हापूरला विमानाने जाणार असून कोल्हापूर मधून हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातल्या कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाही गांधी आणि खर्गे हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे काँग्रेस पक्षासाठी आणि प्रामुख्याने महाविकास आघाडी साठी सांगली जिल्ह्यातला हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रम स्थळी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जयत तयारी करण्यात आली असून मोठी सुरक्षा व्यवस्था ही तैनात असणार आहे.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.