BREAKING | रायगडमध्ये वऱ्हाड्यांचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू

Raigad Truck Collapse Accident LIVE रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला.

BREAKING | रायगडमध्ये वऱ्हाड्यांचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू

रायगड : रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर या ट्रकला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की हा ट्रक थेट 300 फूट दरीत कोसळला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. (Raigad Truck Collapse Accident)

ही घटना सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 34 जण गंभीर जखमी आहेत. तर 25 जण किरकोळ जखमी झाले आहे.

नेमकं काय घडलं? 

पोलादपूर तालुक्यातील कुडपन मार्गावर धनगरवाडी येथील वळणावर ट्रॅक सुमारे 300 फूट दरीत कोसळ्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रत्नागिरीतील खेड तालुक्यातील खवटी धनगरवाडी येथील वऱ्हाड होते. हा ट्रक दरीत कोसळ्याने दोन वर्षापूर्वी झालेल्या आंबेनळी घाटातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होते की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अपघातानंतर लगेचच अनेक ट्रेकर्सने घटनास्थळी धाव घेतली.

शुक्रवारी (8 जानेवारी) सायंकाळी 6.30 च्या सुमारास कुडपण गावात एक लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नकार्यासाठी रत्नागिरीतील खेड तालुक्यातील खवटी धनगरवाडी या ठिकाणाहून वऱ्हाड आले होते. लग्न आटोपून हे वऱ्हाड परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा ट्रक दरीलगत पलटी झाला.

या ट्रॅकमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त जण असल्याची प्रथमिक महिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेड, महाबळेश्वर टेकर्स, पोलादपूरसह महाड येथील टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. तर आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हा संपूर्ण ट्रक वऱ्हाडाने भरलेला होता, अशी माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींवर तात्काळ उपचारही करण्यात येत आहे.

या भीषण घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व स्तरातून मदत कार्य सुरु झाले आहे. पोलादपूर प्रशासन लोकप्रतिनिधी स्थानिक ग्रामस्थ अशा सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र काळोख आणि पावसामुळे मदतकार्यास अडथळा येत आहे. (Raigad Truck Collapse Accident)

संबंधित बातम्या :

उसाने भरलेली गाडी तलावात पडली अन् बैलाचा करूण अंत

नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, आमदार निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट

Published On - 7:13 pm, Fri, 8 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI