रायगडमध्ये दरड कोसळलेल्या गावांच्या पुनर्वसनाकरिता निधी मंजूर, विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता (Rehabilitation) 13 कोटी 25 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

रायगडमध्ये दरड कोसळलेल्या गावांच्या पुनर्वसनाकरिता निधी मंजूर, विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
दरड कोसळलेल्या गावांना निधी मंजूर
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 8:33 PM

मुंबई : गेल्या पावसाळ्यात रायगड (Raigad land slide) जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी कोसळलेल्या दरडींनी सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता (Rehabilitation) 13 कोटी 25 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी,मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) ही गावे बाधीत झाली होती तसेच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरीकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्याच अनुषंगाने या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाकरीता भुसंपादन तसेच नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता 13 कोटी 25 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोणत्या गावांना निधी जाहीर?

त्याअंतर्गत महाड तालुक्यातील तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये भुसंपादन करण्यासाठी 2 कोटी 92 लाख 17 हजार761 रूपये, मौजे केवनाळे मध्ये भुसंपादन करण्यासाठी 64 लाख 26 हजार 148 रूपये, पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) साठी 38 लाख 41 हजार असे एकूण भुसंपादनासाठी 3 कोटी 94 लाख 85 हजार तर महाड तालुक्यातील मौजे तळीये तर कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता 9 कोटी 30 लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे असे एकूण 13 कोटी 25 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आला आहे.

कोकणकरांना मोठा दिलासा

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता 25 लाख 79 हजार रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी,मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाच्या प्रस्तावासही शासनाने मान्यता दिली असल्याने जिल्हाधिकारी, रायगड यांनी प्रस्तावित केल्यानुसार कंटेनर चौथरा तयार करणे, नळ पाणी पुरवठा योजना करणे तसेच रस्ते व ड्रेनेज लाईन तयार करणे इत्यादी कामांसाठी आवश्यक एकूण 55 लाख 58 हजार 384 रूपये इतक्या निधीपैकी 50% म्हणजे एकूण 25 लाख 79 हजार इतका निधी या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत वंचितचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दल आंबेडकर नेमके काय म्हणाले?

‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’, नाना पटोलेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

VIDEO: मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा उद्या राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन: पटोले

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.