बीडच्या पोलीस मुख्यालयावर वीज कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

बीड : राज्यभरात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. बीडच्या पोलीस मुख्यालयातील झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीड जिल्ह्यातील बीड शहर, मांजरसुंभा परिसरात तुरळक पाऊस झाला. विदर्भातही विविध ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, …

बीडच्या पोलीस मुख्यालयावर वीज कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

बीड : राज्यभरात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. बीडच्या पोलीस मुख्यालयातील झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीड जिल्ह्यातील बीड शहर, मांजरसुंभा परिसरात तुरळक पाऊस झाला.

विदर्भातही विविध ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, तर अनेकांची तारांबळही उडाली. वाशिम जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही सांगली, कोल्हापूर या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. कोल्हापूर शहर आणि परिसरात हलक्या सरी बरसल्या असून ढगाळ वातावरण आहे. तर सांगली जिल्ह्यातही विविध भागात हलक्या सरी बरसल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *