पोलिसांच्या बेअक्कलपणाची कीव येते, गुन्हा दाखल होताच राजू शेट्टींचा हल्लाबोल

पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली नव्हती. पोलिसांच्या बेअक्कलपणाची कीव करावीशी वाटते," असा हल्लाबोल माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 11:21 AM, 26 Jan 2021
पोलिसांच्या बेअक्कलपणाची कीव येते, गुन्हा दाखल होताच राजू शेट्टींचा हल्लाबोल
राजू शेट्टी

कोल्हापूर : “आमच्या रॅलीबद्दल येथील पोलीस प्रशासनाला 4 दिवस अगोदरच सांगितलं होतं. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली नव्हती. पोलिसांच्या बेअक्कलपणाची कीव करावीशी वाटते,” असा थेट हल्लाबोल माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पोलिसांवर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी ( 25 जानेवारी) सांगली ते कोल्हापूर अशा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान शेट्टी आणि इतर कार्य़कर्त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यावर बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते कोल्हापुरात ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Raju Shetti criticizes Police and state government on filing case against him)

माझ्याविरोधातच गुन्हा का?

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “अशा वृत्तीमुळेच काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे. आता आता या पक्षाचे फक्त अवशेष राहीले आहेत,” असे राजू शेट्टी म्हणाले. तसेच राहिलेले अवशेष जपा नाहीतर हे अवशेषही संपून जातील असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी कार्यक्रम घेतले होते. या कार्यक्रमांचा आधार घेत त्यांनी सरकारला घेरलं. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांनी गर्दीचे कार्यक्रम घेतले होते. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का?, असा खोचक सवालही त्यांनी सरकारला केला.

शेट्टींसह 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी सांगली ते कोल्हापूर अशा ट्रॅक्टर रॅलीचे आोयजन केले होते. यावेळी या रॅलीचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. त्यांच्यासोबत स्वाभिमानीचे दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते ट्रॅक्टरसह रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याच रॅलीमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याचा ठपका राजू शेट्टींसह इतर कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला. तसेच, यावेळी कोणतीही परवानगी नसताना शेट्टी यांनी ट्रॅक्टर रॅली काढल्याचही पोलिसांनी म्हटलं आहे. शेट्टींविरोधात कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

रॅलीदरम्यान कोरोना नियम न पाळल्याचा ठपका, राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

रॅलीदरम्यान कोरोना नियम न पाळल्याचा ठपका, राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

राजू शेट्टींचा मुद्द्याला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात

(Raju Shetti criticizes Police and state government on filing case against him)