आमचं दैवतच उपाशी, आम्ही कसं खाणार? राळेगणमधील मुलाचं निरागस उत्तर

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरु केलंय. त्यांचं गाव राळेगणसिद्धीमध्ये हे उपोषण सुरु आहे. अण्णांच्या उपोषणामध्ये संपूर्ण गावही सहभाग आहे. संपूर्ण गावाने चूलबंद आंदोलन करत अण्णांना पाठिंबा दिलाय. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी […]

आमचं दैवतच उपाशी, आम्ही कसं खाणार? राळेगणमधील मुलाचं निरागस उत्तर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरु केलंय. त्यांचं गाव राळेगणसिद्धीमध्ये हे उपोषण सुरु आहे. अण्णांच्या उपोषणामध्ये संपूर्ण गावही सहभाग आहे. संपूर्ण गावाने चूलबंद आंदोलन करत अण्णांना पाठिंबा दिलाय. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली आहे.

टीव्ही 9 मराठीने एका घरात जाऊन आढावा घेतला. या घरातील एकानेही सकाळपासून अन्नाचा कणही खाल्लेला नव्हता. एका मुलाने सांगितलं, “आमचं दैवत तिथे सात दिवसांपासून उपाशी आहे, आम्हाला कसं अन्न पोटात जाईल” ही निरागस प्रतिक्रिया या लहानग्या मुलाने दिली.

वाचाहे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!  

देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा यासाठी विविध मागण्या घेऊन अण्णा उपोषणाला बसले आहेत. लोकपालसाठी अण्णांनी अनेकदा उपोषण केलंय. पण आश्वासनापलिकडे त्यांना काहीही मिळालं नाही. दिल्लीत त्यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण केलं होतं. तेव्हाही सरकारने आश्वासन देऊन हे उपोषण गुंडाळलं.

राळेगणमध्ये सुरु असलेलं उपोषण मिटवण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी राळेगणमध्ये येऊन अण्णांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दुपारी 2 वाजल्यापासून चर्चा करत आहेत. पण अण्णा केवळ आश्वासनावर उपोषण मागे घेण्याच्या मूडमध्ये नाहीत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या 

अण्णांच्या सर्व मागण्या जवळपास मान्य, उपोषण मागे घ्या, मुख्यमंत्र्यांची विनंती  

तीन तासांच्या बैठकीनंतरही तोडगा नाहीच, अण्णा उपोषणावर ठाम   

अण्णा, या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका : राज ठाकरे  

हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!  

राळेगणसिद्धी : राज ठाकरे अण्णा हजारेंच्या भेटीला 

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.