पंकजा मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आलंय : राम शिंदे

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आपली पुढील दिशा स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर भाजपमध्ये हालचालींना सुरुवात झाली आहे.

पंकजा मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आलंय : राम शिंदे
Follow us
| Updated on: Dec 03, 2019 | 5:33 PM

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आपली पुढील दिशा स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर भाजपमध्ये हालचालींना सुरुवात झाली आहे. आज (3 डिसेंबर) भाजपचे नेते राम शिंदे आणि विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली (Ram Shinde and Vinod Tawde on Pankaja Munde). यावेळी त्यांच्यात जवळपास एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राम शिंदे यांनी पंकजा मुंडेंच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला (Ram Shinde and Vinod Tawde on Pankaja Munde).

पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर राम शिंदे म्हणाले, “गोपीनाथगडावर सालाबादप्रमाणे दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम असतो. त्या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर घोषणा केली. त्या दरवर्षीच अशी घोषणा करतात. या दिवशी त्या वर्षभरासाठी एक वेगळी दिशा देत असतात. तशीच ही घोषणा होती. मात्र, माध्यमांनी त्यांच्या या घोषणेचा विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”

“हा गोपीनाथ मुंडे यांचा परिवार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात नेलं. अशा नेत्याच्या पंकजा मुंडे कन्या आहेत. अनेक मतदारसंघात त्यांना बोलावणं असतं, त्या तेथे जातात. त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना दुःखी करण्याचं किंवा व्यथित करण्याचं षडयंत्र कोणीतरी रचलं आहे. योग्य त्या वेळी पंकजा मुंडे त्यांची भूमिका जाहीर करतील.”

एकूणच त्यांच्या बोलण्याचा प्रत्येकवेळी विपर्यास केला जातो. त्यामुळे त्या दुःखी आहेत. जेव्हा केव्हा असा काही प्रसंग येईल तेव्हा एकमेकांना भेटणं, संवाद करणं ही भाजपची संस्कृती आहे. संभाषणातून दुःख कमी होत असतं. माझं आणि त्यांचं नातं अतिशय जवळचं आहे. म्हणूनच मी त्यांना प्राधान्यानं भेटायला आलो. विनोद तावडे देखील माझ्यासोबत होते, असंही त्यांनी नमूद केलं.

…म्हणून पंकजा मुंडे दुःखी : विनोद तावडे

विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर अगदीच कमी बोलणं पसंत केलं. ते म्हणाले, “पक्षाशी एकनिष्ठ असणारा परिवार, पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पंकजा मुंडे यांना अशा प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यामुळे स्वाभाविकपणे दुःख होतं. ते दुःख त्यांना नक्की आहे. पंकजा मुंडे पक्षाच्या अतिशय चांगल्या कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे त्या 12 डिसेंबरला त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व अनुयायांना योग्य संदेश देतील, याची मला खात्री आहे.”

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.