वर्ष ट्वेन्टी ट्वेन्टी, शुभेच्छा प्लेन्टी प्लेन्टी, आठवलेंच्या लाजवाब शुभेच्छा

नवीन वर्षाच्या निमित्ताने रामदास आठवलेंनी काव्यात्मक शुभेच्छा दिल्या आहेत.

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 13:07 PM, 1 Jan 2020
वर्ष ट्वेन्टी ट्वेन्टी, शुभेच्छा प्लेन्टी प्लेन्टी, आठवलेंच्या लाजवाब शुभेच्छा

मुंबई : सण-समारंभ कोणताही असो, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हलक्याफुलक्या कवितांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी सोडत नाहीत. नवीन वर्षाच्या निमित्ताने आठवलेंनी अशाच काव्यात्मक शुभेच्छा (Ramdas Athawale New Year Wishes) दिल्या आहेत.

‘नवीन वर्ष ट्वेन्टी ट्वेन्टी,
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून शुभेच्छा प्लेन्टी प्लेन्टी!
2020 नवीन वर्षाच्या देत आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
महायुतीचे सरकार येवो हीच आहे माझी इच्छा!
शेतकरी आदिवासी दलित बहुजन कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सोडणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पिच्छा!नव वर्षाच्या शुभेच्छा देताना सर्वांना देतो समतेच्या फुलांचा गुच्छा!

अशा काव्यमय शुभेच्छा देत रामदास आठवले यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2020 हे नवीन वर्ष सर्व भारतीय जनतेला सुख-सामाधानाचे, आनंदाचे जाईल. त्यासाठी आमचा रिपब्लिकन पक्ष, माझे सामाजिक न्याय मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे केंद्र सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, आणि नव्या वर्षात सर्व भारतीयांना सुखाचे आनंदाचे दिवस येतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त (Ramdas Athawale New Year Wishes) केला आहे.

संबंधित बातम्या :

राफेल ते राहुल, पन्नाशीनिमित्त आठवलेंच्या पाच भन्नाट कविता