डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा अध्यक्ष : रामदास आठवले

डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील आले आहेत. दरम्यान, त्यांच्या दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Ramdas Athawale on Donald Trump India tour).

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा अध्यक्ष : रामदास आठवले
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 4:18 PM

कोल्हापूर : “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे भारतात स्वागत आहे”, अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे (Ramdas Athawale on Donald Trump India tour). कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग उन्नती योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप आज सामाजिक न्याय मंत्री आठवले, आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते करण्यात आलं. हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होतील”, असा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला (Ramdas Athawale on Donald Trump India tour). डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील आले आहेत. ट्रम्प कुटुंबाचं काल (24 फेब्रुवारी) मोठ्या जल्लोषात अहमदाबाद विमानतळावर स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोठा रोड शो काढण्यात आला. त्यानंतर ते साबरमती आश्रमात गेले आणि नंतर सरदार वल्लभाई स्टेडियम येथे मोठी सभा झाली.

दरम्यान, राज्यातील सध्याच्या घडामोडींवर रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. याशिवाय भाजपचे नेते नारायण राणे यांनी आठ दिवसात महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला आहे. राणे असं काही म्हणत आहेत म्हणजे तशा काही हालचाली असतील”, असं रामदास आठवले म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.