आश्रमशाळेतील शिपायाचा सहावीतील मुलीवर बलात्कार

नागपूर: आश्रमशाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीवर आश्रमशाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना येथील मातोश्री सुमनताई आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. पीडित विद्यार्थिनी सहावीत शिकते. अडीच महिन्यांपूर्वी ती शाळेतील सुट्ट्यानंतर आश्रमशाळेत परत आली असता, तेव्हा फक्त तीन विद्यार्थिनी शाळेत परतल्या होत्या. तेव्हा विद्यार्थिनींच्या कमी संख्येचा फायदा घेत, आरोपी शिपाई अशोक चरडे (39 …

आश्रमशाळेतील शिपायाचा सहावीतील मुलीवर बलात्कार

नागपूर: आश्रमशाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीवर आश्रमशाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना येथील मातोश्री सुमनताई आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली.

पीडित विद्यार्थिनी सहावीत शिकते. अडीच महिन्यांपूर्वी ती शाळेतील सुट्ट्यानंतर आश्रमशाळेत परत आली असता, तेव्हा फक्त तीन विद्यार्थिनी शाळेत परतल्या होत्या. तेव्हा विद्यार्थिनींच्या कमी संख्येचा फायदा घेत, आरोपी शिपाई अशोक चरडे (39 वर्ष) याने पीडित विद्यार्थिनींशी लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

भीतीपोटी पीडित विद्यार्थिनीने कुठेही वाच्यता केली नाही. आता पुन्हा आश्रम शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर ती घरी गेली, तेव्हा तिने तिच्या आईकडे सर्व घटना सांगितली.

कुटुंबियांच्या तक्रारीनंतर काल नरखेड पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा आणि अट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला गेला असून, आरोपी शिपाई अशोक चरडेला अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *