रत्नागिरीत तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात, तब्बल 1176 बालके बाधित 

कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुले कोरोनाच्या विळख्यात सापडलेली पाहायला मिळत आहेत. (Ratnagiri District 1176 children affected by corona)

रत्नागिरीत तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात, तब्बल 1176 बालके बाधित 
corona virus

रत्नागिरी : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही अंशी शिथीलता देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचा धोका वर्तवला जात आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. (Ratnagiri District 1176 children affected by corona before the third wave)

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना विळखा घातल्याचे पाहायला येत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुले कोरोनाच्या विळख्यात सापडलेली पाहायला मिळत आहेत.

रत्नागिरीत तब्बल 1176 बालके कोरोनाबाधित 

रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल 1176 बालके कोरोनाबाधित सापडली आहेत. रत्नागिरीत कोरोनाचा विळखा बसलेली बालके 14 वर्षाच्या आधी वयोगटाची आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात बालके बाधित होण्याचं प्रमाण 6.44 टक्के एवढं आहे.

कोरोनाची सद्यस्थिती काय?

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी लॉकडाऊन नाही. रत्नागिरी जिल्ह्यात निर्बंध शिथील केल्यानंतर रत्नागिरी जिल्हा हा झोन 4 मध्ये पाहायला मिळत आहे. रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरु राहणार आहे. सद्यस्थितीत 73 ठिकाणी कंटेनमेंट झोन पाहायला मिळत आहे. रत्नागिरीत दर दिवशी 400 ते 500 कोरोना रुग्ण आढळत आहे. सद्यस्थितीत 6102 ॲक्टिव्ह रुग्ण असून पॉझिटिव्हीटी रेट हा 7.87 टक्के आहे. तर मृत्यूदर हा 2.86 टक्के असून रिकव्हरी रेट हा 87.97 टक्के आहे.

(Ratnagiri District 1176 children affected by corona before the third wave)

संबंधित बातम्या : 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI