राज्यात तीन पक्षांचे सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना : रावसाहेब दानवे

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडीवर सडकून टीका केली आहे (Ravsaheb Danave criticize Maha Vikas Aghadi).

राज्यात तीन पक्षांचे सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना : रावसाहेब दानवे

अहमदनगर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडीवर सडकून टीका केली आहे (Ravsaheb Danave criticize Maha Vikas Aghadi). राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही, असं म्हणत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला. यावेली त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेवरही भाष्य केलं. या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा न घेता त्यांना श्रेणी दिल्यास या विद्यार्थ्यांना कोविड विद्यार्थी असा शिक्का बसेल, असाही दावा रावसाहेब दानवे यांनी केला. ते अहमदनगर येथे आयोजित भाजप कारखानदारांच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, “राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील केले जात नाही असं म्हटलं. याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये समन्वय नाही.” यावेळी दानवे यांनी देशातील अन्नधान्याच्या साठ्याबाबतही माहिती दिली. आपल्या देशात जवळपास 2 वर्षे पुरेल इतकं धान्य आहे. त्यामुळे भविष्यात देखील आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई येणार नाही, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकार आता कोरोना रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहे. आधी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ वेगळं करुन त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांच्या कोरोना चाचणी केल्या जायच्या. मात्र, आता केवळ त्या रुग्णाची चाचणी होते आणि त्यांना घरीच क्वारंटाईन केलं जातं. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. राज्य सरकार कोरोना रुग्णांची योग्य काळजी घेत नाही. राज्य सरकारचे कोरोना समोर हात टेकले आहेच, असाही आरोप दानवे यांनी केला.

“परीक्षा घेणे गरजेचं, अन्यथा त्या विद्यार्थ्यांवर कोविड विद्यार्थी असा कायमचा शिक्का बसेल”

“विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता प्रमाणपत्र भेटलं, तर त्या विद्यार्थ्यांवर कोविड विद्यार्थी असा कायमचा शिक्का बसेल. त्यामुळे राज्यात महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थांच्या परीक्षा घेणे गरजेचे आहे,” अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी देशात सध्या दोन वर्षे पुरेल एवढा अन्न धान्य साठा असून भविष्यात कोणतीही अन्न धान्य टंचाई जाणवणार नाही, असंही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. आज अहमदनगरला विखे यांच्या मेडिकल महाविद्यालयात भाजपच्या कारखानदारांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तर सध्या राज्यात अनेक समस्या असून त्या वरिष्ठांकडे मांडणार असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

ऑनलाईन शिक्षण उपक्रम चांगला, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहतील : विवेक पंडित

राज्यात मान्सूनची जोरदार वाटचाल, पुणे, अहमदनगर, औरंगाबादसह अनेक ठिकाणी मुसळधार

600 रुपयांची मृतदेह बॅग 6,719 रुपयांना कशी? सोमय्यांचा मुंबई मनपावर अंत्यसंस्कार घोटाळ्याचा आरोप

Ravsaheb Danave criticize Maha Vikas Aghadi

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *