काँग्रेसकडे उमेदवार नाहीत, त्यांना 144 जागा द्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

आगामी विधानसभेसाठी राज्यात आम आदमी पक्षाशी (आप) बोलणी सुरु असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

काँग्रेसकडे उमेदवार नाहीत, त्यांना 144 जागा द्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

मुंबई : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची विधानसभेसाठी एकत्र येण्याची खरंच इच्छा आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (VBA Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला आता 288 पैकी 144 जागांची ऑफर दिली आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर (VBA Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर देत भविष्यातील संकेत दिले होते.

काँग्रेसकडे सर्व जागांसाठी उमेदवारही नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेससोबत आघाडी होणार की नाही याबाबत मोठा संभ्रम निर्माण केलाय.

आगामी विधानसभेसाठी राज्यात आम आदमी पक्षाशी (आप) बोलणी सुरु असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

एमआयएम यावेळी स्वतंत्रपणे लढणार असल्याचं बोललं जातंय. यावर प्रश्न विचारता, एमआयएम वेगळं लढणार याबाबत काहीही ऐकिवात नाही, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलं.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी एकत्र निवडणूक लढवली होती.

प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या जाहिरनाम्याबाबतही माहिती दिली. जाहिरनाम्यात पोलीस हवालदारांच्या ड्युटीचा विषय घेण्यात आलाय.

पोलीस शिपाई आज वेठबिगारी आहे. त्यांना 12 तासांऐवजी 8 तासांची ड्युटी आम्ही सत्ता आल्यावर करु, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पोलिसांना युनियन करता येत नाही, म्हणून त्यांचा प्रश्न कुणी उचलला नाही. अवघ्या चार ते पाच हजार रुपये महिन्याने काम करणारे नागरी सेवक यांनाही पोलिसात घेऊन त्यांचा प्रश्न सोडवू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *