… म्हणून सलमान-सुनिल ग्रोव्हर कपिलच्या रिसेप्शनला गैरहजर

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ हे 12 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी पद्धतीने पार पडला. कपिल आणि गिन्नीने ग्लॅमर इंडस्ट्रीसाठी 24 डिसेंबर सोमवारला मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली. जेडब्ल्यू मॅरेट येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलीवूड ते टीव्ही जगातील अनेकांनी हजेरी लावली. …

salman khan, … म्हणून सलमान-सुनिल ग्रोव्हर कपिलच्या रिसेप्शनला गैरहजर

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ हे 12 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी पद्धतीने पार पडला. कपिल आणि गिन्नीने ग्लॅमर इंडस्ट्रीसाठी 24 डिसेंबर सोमवारला मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली. जेडब्ल्यू मॅरेट येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलीवूड ते टीव्ही जगातील अनेकांनी हजेरी लावली. मात्र दबंग सलमान खान आणि कॉमेडीयन सुनिल ग्रोव्हर या पार्टीमध्ये आले नाही. हे दोघे या पार्टीत का नाही आले यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

सलमान खान हा कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या पर्वाचा निर्माता आहे. त्यामुळे तो या पार्टीला हजर राहणार अशी सर्वांना अपेक्षा होती. तर दुसरीकडे सुनिल ग्रोव्हरने कपिलच्या लग्नावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सांगितले होते की, ‘लग्नाला नाही येऊ शकलो, पण रिसेप्शनला नक्की येईल’. मात्र हे दोघेही या रिसेप्शन पार्टीला पोहोचले नाहीत.

कपिलच्या रिसेप्शन पार्टीला सलमान खानचे वडील सलीम खान आणि भाऊ सोहेल खान आले. मग सलमान का आला नाही, असे प्रश्न उपस्थित झाले. काही वृत्तांनुसार सलमान हा ‘बिग बॉस-12’च्या फिनालेच्या तयारीत व्यस्त होता, म्हणून तो आला नाही. तर सुनिल आपल्या ‘कानपुर वाले खुरानाज’ या शोच्या लॉन्चिंगमध्ये व्यस्त असल्याचं बोललं गेलं. मात्र त्यांचं कपिलच्या पार्टीत न येण्याचं कारण काम नाही तर काही वेगळं होतं.

salman khan, … म्हणून सलमान-सुनिल ग्रोव्हर कपिलच्या रिसेप्शनला गैरहजर

कतरिना कैफच्या ख्रिसमस पार्टीचे काही फोटो समोर आले, तेव्हा सलमान आणि सुनिल कपिलच्या रिसेप्शनमध्ये न जाता कतरिनाच्या पार्टीत गेल्याचं उघडं झालं. कपिलचं रिसेप्शन आणि कतरिनाची ख्रिसमस पार्टी एकाच दिवशी होती. तेव्हा कतरिनाच्या पार्टीत जाण्यासाठी सलमान खान आणि सुनिल ग्रोव्हरने कपिलचे रिसेप्शन टाळले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *