नाशिक मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानासह एका महिन्याचे आगाऊ वेतन थेट खात्यात

यंदाच्या वर्षी कुठलीही तांत्रिक अडचण न आल्याने दोन महिन्यांचे वेतन आणि अतिरिक्त 14 हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आले असून कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

नाशिक मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानासह एका महिन्याचे आगाऊ वेतन थेट खात्यात
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 9:29 PM

Nashik News : नाशिक महानगर पालिकेच्या (NMC) कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाच्या (Diwali Festival) वर्षी गोड होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान 15 हजार रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन देखील आगाऊ देण्यात आले आहे. नियमित साडेचार हजार कर्मचारी तर तीन हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा लाभ झाला आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर नाशिक महानगर पालिकेने तत्परतेने ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक महानगर पालिकेत जवळपास 7082 पदे मंजूर आहेत, प्रत्यक्षात मात्र 4596 अधिकारी कर्मचारी काम करत आहे. अपुऱ्या मनुष्यबळ असल्याने पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव असतो. स्थानिक पातळीवर हे कर्मचारी असल्याने नाशिककरांना सुविधा देण्यासाठी कर्मचारी मेहनत घेत असतात. त्यामुळे सानुग्रह अनुदान आणि आगाऊ वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्याचे वेतन हे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 01 ऑक्टोबरला जमा झाले होते, त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीवर 25 कोटीहून अधिक रुपयांचा भार पडला आहे.

या व्यतिरिक्त तीन हजाराहून अधिक पेन्शन धारकांचा जवळपास 12 कोटी रुपयांचा भार पडतो, त्यात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून उत्पन्न देखील घटले आहे.

कर विभागाच्या वतीने याच पार्श्वभूमीवर कार वसुलीची मोहीम हाती घेतली होती, लाखाच्या वर थकीत कर असलेल्या मालमत्ता धारकांना नोटिसा बजावत कर वसूली केली होती.

तर नोटिसा बजावून देखील मालमत्ता धारकांनी कर न भरल्याने ढोल बजाओ मोहीम पालिकेने हाती घेतली होती, त्यानुसार एक कोटीच्या वर रक्कम पालिकेच्या तिजोरीत आली होती.

यंदाच्या वर्षी कुठलीही तांत्रिक अडचण न आल्याने दोन महिन्यांचे वेतन आणि अतिरिक्त 14 हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आले असून कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.