AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2025 | 8:15 PM
Share

महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे, राज्याला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान झालं आहे. पीक तर पुराच्या पाण्यात वाहून गेलंच पण सोबतच शेतातील मातीसुद्धा वाहून गेली आहे. ऐन हाततोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हातबल झाले आहेत. आता काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक गावांचा सर्पंक तुटला आहे. घरादारात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेल्यानं नागरिक रस्त्यावर आले आहेत. शेतीसोबतच घरादाराचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता नुकसानग्रस्तांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्याला बसला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजणी आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानाची पहाणी केली, यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.  सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत, कुठेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकारला नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. ऑलरेडी आम्ही पैसे रीलीज करायला सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार  200 कोटींचा पहिला हाप्ता मंजूर झाला आहे. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान 

दरम्यान यंदा राज्यातील मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे, पावसामुळे उभी पिकं पाण्याखाली गेली असून, शेतीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरल्याचं चित्र आहे, काही ठिकाणी गावाला पुराचा वेढा पडल्यानं नागरिक गावात अडकले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे.

पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्....
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!.
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्....
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?.
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?.
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल.
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल.
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार.
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत.
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा.