ईएमआयवर धार्मिक विधी, हप्त्याने दक्षिणा! 

ईएमआयवर धार्मिक विधी, हप्त्याने दक्षिणा! 

चंदन पुजाधिकारी टीव्ही 9 मराठी, नाशिक: नाशिक शहराची मंदिरांचे शहर म्हणून ओळख आहे. या मंदिरांच्या शहरात अनेक पूजा-विधी होतात. त्यांचा खर्चही अमाप असतो. मात्र आता सत्यनारायण पूजेपासून, बारसे ते अंत्यविधीपर्यंत सगळे धार्मिक विधी सुलभ हप्त्याने अर्थात ईएमआयवर करता येणार आहेत. याआधी तुम्ही गाडी, फर्निचर, मोबाईलसारखी उपकरणं खरेदी करताना, सुलभ हप्त्यांचा पर्याय अवलंबला असेलच. आता धार्मिक विधीची भन्नाट संकल्पना नाशिकच्या अनिकेत शास्त्री महाराजांनी प्रत्याक्षात समोर आणली आहे.

अनेकांना घरात सत्यनारायण पूजेपासून ते मोठे धार्मिक कार्यक्रम करण्याची भावना असते. पण, आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना ते शक्य होत नाही. याचाच विचार करून अनिकेत शास्त्री महाराजांनी सगळे धार्मिक विधी सुलभ हप्त्याने करण्याची व्यवस्था नाशिकमध्ये सुरु केली आहे.

देशात पहिल्यांदाच सुलभ हप्त्याने धार्मिक विधी करण्याची सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध झाली आहे.

“अनेकदा घरात सत्यनारायण पूजा किंवा मोठे धार्मिक कार्यक्रम करायचे म्हटले की, पैशांचा प्रश्न उभा राहतो. एकाचवेळी हे धार्मिक कार्यक्रम करण्याची आर्थिक क्षमता बहुतांश लोकांची नसते. त्यामुळे मनात इच्छा असूनही धार्मिक विधी करता येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन हा सुलभ हप्ता सुरु करत आहे.” असं अनिकेत शास्त्री महाराजांनी सांगितलं.

सहा महिने, आठ महिने आणि वर्ष अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने विधी झाल्यानंतर त्याची दक्षिणा आपल्याला देता येणार आहे. तसेच, गोरगरीब आणि शेतकरी भाविकांना याचा फायदा घेता येणार आहे