लॉकडाऊन शब्द काढा, प्रतिबंध शब्द महत्त्वाचा; मुंबईच्या पालकमंत्र्यांचं आवाहन

मुंबईचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Sheikh) यांनीही या सर्व प्रकरणावर भाष्य केलंय. Guardian Minister of Mumbai Aslam Sheikh

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:46 PM, 7 Apr 2021
लॉकडाऊन शब्द काढा, प्रतिबंध शब्द महत्त्वाचा; मुंबईच्या पालकमंत्र्यांचं आवाहन
अस्लम शेख आणि कोरोना विषाणूचा सांकेतिक फोटो

मुंबईः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादण्यात आलेत. राज्यात वीकेंड लॉकडाऊनचीही घोषणा करण्यात आलीय. ठाकरे सरकारनं (Thackeray Government) लादलेल्या निर्बंधांवर व्यापारी आणि नाभिक संघटनांनी निषेध व्यक्त केलाय. मुंबईचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Sheikh) यांनीही या सर्व प्रकरणावर भाष्य केलंय. (Remove the word lockdown, the word prevention is important; Appeal of the Guardian Minister of Mumbai Aslam Sheikh)

लॉकडाऊन हा शब्द तुम्ही काढा, प्रतिबंध हा शब्द महत्त्वाचा

लॉकडाऊन हा शब्द तुम्ही काढा, प्रतिबंध हा शब्द महत्त्वाचा आहे. आम्ही कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे कठोर निर्बंध आणले आहेत. सकाळी आम्हाला पाईप असोसिएशन, डायमंड असोसिएशनचे व्यापारी यासंदर्भात भेटले बोलले. यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबर बोलू आणि निर्णय घेऊ, असंही अस्लम शेख म्हणालेत. त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीव वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय

जगात सगळीकडे लॉकडाऊन झाला, तिथेही निषेध झाला. बदनाम झालो तरी हरकत नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीव वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय. जेव्हा रुग्ण कमी होते, तेव्हा केंद्र सरकारने डबल, टिबल लस दिली. आम्ही लसीकरणासाठी केंद्रे वाढवली, मोहीम राबवली, मनुष्यबळही वाढवलं. लसीकरणासाठी आता लसींची कमतरता दिसत आहे, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

आम्हाला वयाचे निकष लावू नका

केंद्र सरकारकडे सतत मागणी करत आहोत. आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, सचिव पातळीवर यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जातोय. आम्हाला वयाचे निकष लावू नका. लसीकरण सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या, वयाची मर्यादा लावू नका. पण केंद्र सरकार पाकिस्तानला, बांगलादेशला आणि इतर देशांना लसीचा पुरवठा करत आहे. पहिला आपल्या देशांमधल्या आपल्या लोकांना द्या, अमेरिकेने आपल्या लोकांना लसीकरण केले, नंतर त्याने इतर देशांना पुरवठा केलाय, असंही अस्लम शेख म्हणालेत.

कोरोचा प्रादुर्भाव वाढत असतानाच विरोधक राजकारण करतायत

विरोधी पक्ष कोरोचा प्रादुर्भाव वाढत असतानाच राजकारण करतात. जगात सर्व पक्ष कोरोनाच्या संकटकाळात एकमेकाला सहाय्य करत आहेत. महाराष्ट्रात विशेष करून राजकारण केले जात आहे. मुंबईतच रुग्ण वाढत आहेत. लसीकरण टेस्टिंग किट हे योग्य आहे की नाही हे तपासा. सरकारची प्राथमिकता लोकांचे जीव वाचवण्याची असल्याचंही अस्लम शेख यांनी अधोरेखित केलंय. Remove the word lockdown, the word prevention is important; Appeal of the Guardian Minister of Mumbai Aslam Sheikh)

संबंधित बातम्या

लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरु, प्रकाश आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा

Aurangabad Corona | बेड्सची उपलब्धता ते कोरोना चाचणी केंद्र, औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती काय?

Remove the word lockdown, the word prevention is important; Appeal of the Guardian Minister of Mumbai Aslam Sheikh