उदयनराजेंची 'ती' प्रतिक्रिया उद्विग्न भावनेतून आली असावी: प्रकाश शेंडगे

राज्यातील मागासवर्गीय समाज व बारा बलुतेदारांचे आरक्षण काढून चालणार नाही, असं माजी आमदार व ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले. ( Prakash Shendge said Reservation should not be remove.)

उदयनराजेंची 'ती' प्रतिक्रिया उद्विग्न भावनेतून आली असावी: प्रकाश शेंडगे

मुंबई : सर्वांचे आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण देण्याची मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्विग्न भावनेतून केली असावी, असे मत माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील मागासवर्गीय समाज व बारा बलुतेदारांचा जीवनासाठी संघर्ष अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करुन चालणार नाही, असं माजी आमदार व ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.(Reservation should not be remove, said former MLA and OBC leader Prakash Shendge)

“भाजपाच्या ओबीसी सेलला उशिरा सुचलेलं शहाणपण”

भाजपाच्या ओबीसी सेलच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत, ओबीसी समाजाचे विविध प्रश्न लवकर मार्गी लावावेत अशी मागणी केली. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंतीही राज्यपालांना केली. यावर बोलताना “हे भाजपच्या ओबीसी सेलला उशिराने सुचलेले शहाणपण आहे” अशी खोचक टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. मात्र भाजपचे आभार मानत, यापुढेही भाजपच्या ओबीसी नेत्यांनी समाजासोबत उभे राहावे, असा आशावाद शेंडगेंनी व्यक्त केला.

दरम्यान, ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलनाची सुरुवात करु, असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

हे ही वाचा: मराठा उमेदवारांना EWS चे लाभ, आंदोलकांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचे 8 मोठे निर्णय

 

आरक्षणावर काय म्हणाले उदयनराजे? 

“मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा” असं उदयनराजे म्हणाले.

आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष निर्णाण झाला आहे. लवकरात लवकर आरक्षण द्या, अशी मागणी मराठा समाजाकडून होतेय. त्यासाठी राज्यभर मोर्चेही निघत आहेत. पुण्यात 3 ऑक्टोबरला मराठा आरक्षणावर विचारमंथन बैठक होणार आहे. बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी साताऱ्यात विनायक मेटे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या : 

क्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावेल : उदयनराजे

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Maratha Reservation : स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर

(Reservation should not be remove, said former MLA and OBC leader Prakash Shendge)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *