प्रवाशांच्या सुरक्षतेची जबाबदारीही आता वाहन चालकावरच, लातूरात नवी नियामवली

ओमिक्रॅानचे सर्वाधिक रुग्न हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवरही प्रशासन सतर्कता बाळगत आहे. योग्य ती खबरदारी आता लातूर शहरासह ग्रामीण भागात घेतली जात असतानाच लातूर मनपाच्या वतीने एक वेगळाच नियम जारी करण्यात आला आहे. प्रवास करणऱ्या प्रवाशाला मास्क नसेल तर मात्र वाहनचालकालाही दंड आकारला जाणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षतेची जबाबदारीही आता वाहन चालकावरच, लातूरात नवी नियामवली
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 4:12 PM

लातूर : ओमिक्रॅानचे सर्वाधिक रुग्न हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवरही प्रशासन सतर्कता बाळगत आहे. योग्य ती खबरदारी आता लातूर शहरासह ग्रामीण भागात घेतली जात असतानाच (Latur Municipal Corporation) लातूर मनपाच्या वतीने एक वेगळाच नियम जारी करण्यात आला आहे. प्रवास करणऱ्या प्रवाशाला मास्क नसेल तर मात्र वाहनचालकालाही दंड आकारला जाणार आहे. म्हणजेच वाहनात येणाऱ्या प्रवाश्याने मास्क घातले आहे की नाही याची जबाबदारी चालकावरच राहणार आहे. नियम वेगळा असला तरी मनपा प्रशासनाचा उद्देश चांगला असल्याने लातूरकर याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सांगून झाले, आता दंडात्मक कारवाई

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्नांची संख्या कमी असली तरी, योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. यामध्ये आता नव्या व्हेरीयंटची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही वेगवेगळे नियम लादले जात आहेत. यापूर्वी ज्यांनी एकही डोस घेतला नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आले होते. शिवाय पेट्रोल-डिझेलही दिले जात नव्हते. हे सर्व करुनही प्रशासनाच्या आवहानाला प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारपासून दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. मनपा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही कारवाई करीत आहे.

परवानाधारक वाहनांना नोटीसा

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी एक ना अनेक प्रयोग राबवले जातात. मात्र, नागरिक तेवढ्या सजगतेने राहत नसल्याने आता वेगवेगळे नियम ठरवून दिले जात नाहीत. म्हणूनच अॅटोरिक्षा, प्रवासी खासगी वाहतूक करणाऱ्या बसेस, स्कूल बस, टुरिस्ट टॅक्सी, परवानाधारक अॅटोरिक्षा या सर्वच प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांना आता प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला आहे का? हे पाहूनच प्रवेश द्यावा लागणार आहे. अन्यथा प्रवाशाने मास्क घातलेला नसला तरी दंड हा वाहनचालकालाच भरावा लागणार आहे. त्यामुळे अधिकतर लातूरकर हे मास्क वापरतील हा त्यामागचा उद्देश आहे.

मनपा, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे दंड आकारुन महसून गोळा करण्याचा उद्देश हा प्रशासनाचा नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कठोर निर्णय घेतले जात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. शिवाय मंगळवारपासून नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्याला दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्यांनी मास्क घातलेला नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क असलेल्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

सावत्र मुलीवर अत्याचार, अहमदनगरमध्ये नराधम बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

आजीची हत्या करुन दागिन्यांची चोरी, नांदेडमध्ये पाच दिवसात नातू जेरबंद

Gopichand Padalkar: बैलगाडी शर्यतीसाठी पुन्हा मैदानात उतरुन सरकारची पळता भुई थोडी करु, गोपीचंद पडळकरांचा इशारा

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.