निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रीय कार्यकर्ता ते न्यायसंस्थेतील महत्त्वाची पदं असं धगधगतं आयुष्य […]

निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रीय कार्यकर्ता ते न्यायसंस्थेतील महत्त्वाची पदं असं धगधगतं आयुष्य जगलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने महाराष्ट्रासह एकंदरीत देशाच्या विचारविश्वातील महत्त्वाची व्यक्ती हरपली.

चंद्रशेखर धर्माधिकारी हे विचाराने गांधीवादी होते. त्यांना महात्मा गांधी यांचा काही काळ सहवासही लाभला होता. गेली चाळीसहून अधिक वर्षे ते गांधीवादाचा प्रसार-प्रचार करत होते. गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्या वागण्या-बोलण्यावर आणि एकंदरीतच स्वभावावर होता. अत्यंत सुस्वभावी, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं नाव घेतलं जाई.

स्वातंत्र्यपूर्व काळात 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यसेनानी दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील. घरातच देशभक्तीचं बाळकडू मिळालेले चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी पुढे सक्रीयपणे स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नोंदवला. 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली. देशभक्ती त्यांच्या अंगान भिनली होती. शेवटच्या श्वासापर्यंत देशाप्रती असलेली तळमळ दिसून येत असे.

प्राथमिक शिक्षण नागपुरातील महापालिकेच्या शाळेत घेतल्यानंतर पुढे ते वर्ध्याला स्थलांतरित झाले. तेथेच पुढील शिक्षण घेत, नंतर एस. बी. सिटी कॉलेज आणि नागपूर विधी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. नंतर नागपूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश झाले. निवृत्तीनंतरही ते सार्वजनिक आयुष्यात सक्रीय राहिले.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा वाचन आणि लेखनाचा व्यासंग मोठा होता. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन आणि चालू घडामोडींवर वेळोवेळी लेखही लिहिले आहेत. राज्यासह देशातील अत्यंत महत्त्वाच्या पुरस्कारांनी चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा आतापर्यंत गौरव झाला आहे. भारत सरकारने त्यांना मानाचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरवलं आहे.

‘टीव्ही 9 मराठी’तर्फे निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना भावपूर्ण आदरांजली!

VIDEO : काही वर्षांपूर्वी अभिनेता आमीर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी हजेरी लावली होती. आपले विचार किती सुस्पष्ट आहेत, हे त्यांच्या बोलण्यावरुन जाणवते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.