सातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ

सातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं एकच खळबळ उडालीय.

  • रवी लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर
  • Published On - 23:15 PM, 19 Jan 2021
सातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ

पंढरपूरः सातारा-पंढरपूर एसटी बसवर अज्ञात हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ उडालीय. माळशिरसजवळील पिलीव घाटात सातारा-पंढरपूर एसटीवर पहिल्यांदा दगडफेक करण्यात आली. त्यानंतर चार ते पाच जणांच्या टोळक्यानं गाडी थांबवत त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय, तसेच एसटीतील लोकांना मारहाणसुद्धा करण्यात आलीय. या दगडफेकीत एसटीचा चालक जखमी झाल्याची माहिती मिळालीय. पंढरपूरमधून साताऱ्याकडे एसटी जात असताना ही घटना घडलीय. पंढरपूर-सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आलाय. (Robbers Took Possession Of Satara-Pandharpur ST Bus)

पंढरपूर-सातारा रस्त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास म्हसवडनजीकच्या पिलीव घाटात चार-पाच अज्ञात हुल्लडबाजांनी एसटी आणि मोटरसायकल चालकावरही दगडफेक केली. मोटरसायकल चालक जखमी झाले असून, एसटीच्या काचा फुटून त्यातील प्रवासी जखमी झालेत. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. माळशिरस आणि म्हसवड पोलीस घटनास्थळी रवाना झालेत. दरोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या हुल्लडबाजांनी ये-जा करणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. तसेच एसटीवर ही दगडफेक झाली असून, गाडीच्या काचा फुटल्या आहेत. माळशिरस आणि म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पंढरपूर-सातारा परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.