विधानसभा अधिवेशनादरम्यान रोहा-तांबडी भव्य मराठा मोर्चा निघणार, नाव न घेता तटकरे पिता पुत्रीवर गंभीर आरोप

जिल्ह्यातील रोहा तालुक्यात 14 वर्ष मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी मराठा मोर्चा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे (Roha Tambadi Maratha Morcha against rape).

विधानसभा अधिवेशनादरम्यान रोहा-तांबडी भव्य मराठा मोर्चा निघणार, नाव न घेता तटकरे पिता पुत्रीवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 2:36 PM

रायगड : जिल्ह्यातील रोहा तालुक्यात 14 वर्ष मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी मराठा मोर्चा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे (Roha Tambadi Maratha Morcha against rape). त्यांनी आज (17 ऑगस्ट) दुसऱ्यांदा पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसेच पीडितेला न्याय न मिळाल्यास आगामी विधानसभा अधिवेशनादरम्यान रोहा-तांबडी असा भव्य मराठा मोर्चा काढणार असल्याचाही इशारा सरकारला दिला. यावेळी त्यांनी सकल मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चाही केली.

मराठा मोर्चा समन्वयकांनी सुनिल तटकरे आणि अदिती तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरे म्हणाले, “या जिल्ह्याचे खासदार आणि या मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. पालकमंत्री या महिला असतानाही या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या प्रकरणामध्ये शंका निर्माण होते आहे.”

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह जंगलात सापडला

मराठा मोर्चाने भूमिका घेतल्याने रोहा तालुक्यात घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेविरोधात वातावरण तापणार असल्याचं दिसत आहे. मराठा मोर्चा समन्वयकांची या भेटीत स्थानिक पचंक्रोशीच्या ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. स्थानिक पातळीवरच विधानसभा अधिवेशना दरम्यान मोर्चा काढण्याची तारीख निश्चित करण्याचे ठरले. मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा दोन्ही संघटना रोहा-ताबंडी प्रकणात पहिल्यांदाच सोबत असणार आहे, अशी माहिती समन्वयकांनी दिली.

… तर 26 सप्टेंबरला रोह्यातील तांबडीतून 60 वा मराठा क्रांती मोर्चा

दरम्यान, पीडितेला आदरांजली देण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावर सकल मराठा समाजातर्फे पीडित मुलीला आदरांजली वाहण्यासाठी बॅनर लावण्यात आले. तसेच या बॅनरला हात लावण्याची हिंमत कोणीही करु नये, असा इशारा समन्वयक राजन घाग यांनी दिला. याआधी मराठा मोर्चा समन्वयकांनी गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांची भेट घेऊन पीडितेच्या कुटुंबियांना खटला संपेपर्यंत सरंक्षण देण्याची मागणी देखील केली होती.

प्रकरणाचा चौकशी अधिकारी बदलल्याने मराठा समन्वयकांची नाराजी

रोहा अत्याचार प्रकरणाचा तपास डीवायएसपी किरण कुमार सर्यवंशी यांच्याकडून काढुन घेतल्याने मराठा समन्वयकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. याविषयी त्यांनी रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शेख यांच्याकडे देण्यात आल्याचा खुलास करण्यात आला. यावेळी राजन घाग, महेश डोंगरे, महेश राणे, युवराज सुर्यवंशी, रमेश खोरे पाटील, राजू भुळे, विवेक सावंत, रुपाली निंबाळकर, छाया इंदुलकर, श्यामा पवार इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, अवघ्या 12 तासात आरोपीला अटक

Maratha Kranti Morcha | कोपर्डी, रोहा निकालाबाबत लेखी आश्वासन द्या – राजन घाग

Roha Tambadi Maratha Morcha against rape

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.