सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे देश बुडायला नको : रोहित पवार

सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे आपला देशच बुडायला नको, अशी भीती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रोहित पवारांनी मांडली आहे.

सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे देश बुडायला नको : रोहित पवार

मुंबई : ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी केंद्र सरकारवर टीका करण्याची भीती वाटत असल्याची भावना व्यक्त केल्यानंतर शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही काळजी व्यक्त केली आहे. सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे आपला देशच बुडायला नको, अशी भीती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रोहित पवारांनी (Rohit Pawar on Central Govt) मांडली आहे.

‘राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकार मधील मंत्री सांगत आहेत त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहीत आहेत, आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात.’ असं रोहित पवारांनी लिहिलं आहे.

‘सरकार आणि उद्योगपती यांच्यात जर चांगला संवाद असेल, धंद्यासमोरच्या खऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची सरकारची तयारी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळू शकते पण यासाठी गरज आहे ती उद्योगपतींशी संवाद साधण्याची, त्यांची बाजू ऐकून घेण्याची. मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्या वरील टीका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको.’ अशी भीती त्यांनी व्यक्त (Rohit Pawar on Central Govt) केली आहे.

राहुल बजाज काय म्हणाले होते?

सध्या भीतीचं वातावरण आहे आणि लोक सरकारवर टीका करण्यास घाबरतात. सरकार कोणत्याही टीकेचे स्वागत करेल, किंवा खुल्या मनाने स्वीकारेल, असा विश्वास नसल्याचं उद्योजक राहुल बजाज म्हणाले होते.

गाडीतून जाताना खेळण्याचं दुकान दिसलं, आमदारांमधील ‘बाप’ जागा झाला!

यूपीए-2 च्या काळात आम्ही कुणावरही टीका करु शकत होतो. मात्र, आज तुम्ही चांगलं काम करत आहात. त्यानंतरही आम्ही तुमची खुलेपणाने चिकित्सा करु आणि तुम्ही ती स्वीकाराल हा विश्वासच येत नाही.” असं राहुल बजाज म्हणाले होते.

“कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने माध्यमांवर टीका केली जात आहे. परंतु आपण असं वातावरण असल्याचं म्हणत असाल तर आम्हाला ते सुधारण्यासाठी काम करण्याची गरज आहे,” असं उत्तर भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं होतं.

संबंधित बातम्या :

प्रज्ञा ठाकूर, नथुराम गोडसे ते मॉब लिंचिंग, प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांची अमित शाहांवर प्रश्नांची सरबत्ती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *