AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : आजचं राजकारण हे किळसवाणं आणि…रोहित पवारांची खिन्न करुन सोडणारी भावनिक पोस्ट

Rohit Pawar : अजित दादांच्या निधनाला अजून आठवडा सुद्धा उलटलेला नसताना महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झालय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. त्यावरुन दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Rohit Pawar : आजचं राजकारण हे किळसवाणं आणि...रोहित पवारांची खिन्न करुन सोडणारी भावनिक पोस्ट
Rohit Pawar
| Updated on: Feb 04, 2026 | 12:17 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार असे अक्समात निघून गेले, यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाहीय. मागच्या आठवड्यात 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांचं खासगी चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही मिनिटं आधी कोसळलं. यात अजितदादांसह विमानातील सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या निधनाला अजून आठवडा सुद्धा उलटलेला नसताना महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झालय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. त्यावरुन दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर तीनच दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावरही टीका सुरु आहे. शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दोन गोष्टी सांगितल्या. त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरु झाल्या. 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं, असा दावा शरद पवार यांनी केला. तसच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची आपल्याला कल्पना नाही असही ते म्हणाले. त्यानंतर दिवसभर जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. अजितदादा हयात असताना काय चर्चा झालेली? कोणासोबत ते बोलले होते? कोणाला काय सांगितलेलं? यावर बरेच दावे-प्रतिदावे झाले.

त्यांना आधार दिला

या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक पोस्ट केलीय. “आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!” अशी विचार करायला भाग पाडणारी रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे.

अजितदादांच्या निधनानंतर रोहित पवारही कोलमडल्याच पहायलं मिळालं. महाराष्ट्राच्या राजकारणात या काका-पुतण्याच्या जोडीची खूपच चर्चा होती. अजितदादा अचानक निघून गेल्यानंतर कोलमडलेले रोहित पवार पुन्हा उभे राहिले. कार्यकर्त्यांना धीर दिला, आधार दिला. त्या विमानात अजितदादांसोबत असलेल्या फ्लाइट अटेंडट पिंकी माळी यांचा सुद्धा मृत्यू झाला. रोहित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना आधार दिला.

महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला.
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात.
शरद पवार मविआकडूनच राज्यसभेवर जाणार?
शरद पवार मविआकडूनच राज्यसभेवर जाणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?.
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!.
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!.