खासदार जयसिद्धेश्वर स्वामींविरोधात रिपाइंचं आंदोलन, मोर्चेकरी पोलिसांच्या ताब्यात

खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना शहरात फिरु देणार नाही, असा इशारा आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:40 PM, 27 Jan 2021
खासदार जयसिद्धेश्वर स्वामींविरोधात रिपाइंचं आंदोलन, मोर्चेकरी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला जातपडताळणी समितीनं रद्द केला आहे. जातीच्या बनावट दाखल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल असतानाही खासदार जयसिद्धेश्वर स्वामी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचं आरपीआयच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.(RPI’s agitation against MP Jayasiddheshwar Swamy)

खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना शहरात फिरु देणार नाही, असा इशारा आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. आरपीआयचे नेते प्रमोद गायकवाड यांनी नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून खासदारांच्या निवासस्थानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं.

जयसिद्धेश्वर स्वामींचा दाखल रद्द

सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराज अडचणीत आले आहेत. जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं म्हणत, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला, असा दावा तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी केला.

खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती.

दरम्यान जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळकागदपत्राबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे महास्वामीजींची खासदारकी धोक्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा निवडणूक

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील भाजप नेत्यावर खासदारकी रद्द होण्याची टांगती तलवार

भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना धक्का, जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात

RPI’s agitation against MP Jayasiddheshwar Swamy