भातगिरणी मालकाला 80 कोटींचं बिल; महावितरणाकडून चुकीची दुरुस्ती

मात्र महावितरणाने आपल्या चुकीची दुरुस्ती करून गिरणीमालकाला घरपोच सुधारित बिल दिले आहे. तसेच आपली चूक सुधारली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:25 PM, 24 Feb 2021
भातगिरणी मालकाला 80 कोटींचं बिल; महावितरणाकडून चुकीची दुरुस्ती
MSEDCL Wrong correction

वसईः वसईत एका भात गिरणी मालकाला दोन महिन्यांच तब्बल 80 कोटी वीजबिल एकच खळबळ उडाली होती. एवढ्या प्रचंड रकमेचं बिल हाती येताच गिरणी मालकाला चांगलाच धक्का बसला होता. मात्र महावितरणाने आपल्या चुकीची दुरुस्ती करून गिरणीमालकाला घरपोच सुधारित बिल दिले आहे. तसेच आपली चूक सुधारली. त्याचबरोबर एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. मीटर वाचन करणाऱ्या एजन्सीवर गुन्हाच दाखल करण्यात आलाय. (Rs 80 crore bill to paddy mill owner; Wrong correction from MSEDCL)

81 वर्षांचे आजोबा गणपत नाईक यांना आलं 80 कोटींचं बिल

81 वर्षांचे आजोबा गणपत नाईक यांना हे बिल आलेय, वसईच्या निर्मळ भागात जगमाता ही भाताची गिरणी आहे. गेल्या 20 वर्षांपासून भात गिरणीचा व्यवसाय ते करत आहेत. त्यांचा मुलगा सतीश याचं दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं.

एका महिन्यासाठी जास्तीत जास्त 50 ते 60 हजार वीजबिल येते

भातगिरणीतील वीज मीटर मुलाच्या नावे आहे. या दुःखातून त्यांचे कुटुंब सावरत नाही तोच त्यांना एक नवा धक्का बसला. महावितरणानं त्यांना दोन महिन्यांच तब्बल 80 कोटी 13 लाख 89 हजार 600 रुपयांचे वीजबिल पाठवलं. नाईक यांना एका महिन्यासाठी जास्तीत जास्त 50 ते 60 हजार वीजबिल येतं. मात्र एवढ्या बिलानं ते हादरुनच गेले होते.

महावितरणानं संबंधित लिपिकाला केलं निलंबित

महावितरणाने मीटर वाचन यंत्रणेत नोंद करताना चूक झाल्याच मान्य केलं. तर देयक दुरुस्ती झाल्याशिवाय ग्राहकाला वीज बिल देऊ नका, अशा सूचना ही एजन्सीला देण्यात आल्या होत्या. तरीही वीजबिल ग्राहकाच्या हातात गेल्यानं महावितरणानं संबंधित लिपिकाला निलंबित केलं. तर सहाय्यक लेखापाल आणि उपविभागीय अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस दिली. Rs 80 crore bill to paddy mill owner; Wrong correction from MSEDCL

मीटर वाचन घेणाऱ्या एजन्सीवर तर गुन्हाच दाखल

तसेच चुकीचे देयक वितरीत केल्याप्रकरणी मीटर वाचन घेणाऱ्या एजन्सीवर तर गुन्हाच दाखल केला असल्याचं महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे यांनी फोनवर सांगितलं. पण कॅमेरावर बोलण्यास मात्र नकार दिला आहे. तसेच नाईक यांना सुधारित 86 हजार 890 रुपयाचं वीजबिल घरी जाऊन देण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. वसई विरारमधील हजारो ग्राहकांना गेल्या अनेक महिन्यांपासून अवाजवी वीज देयके येत आहेत. अवावजी आणि चुकीच्या वीज देयकाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप भाजपनं केलाय.

संबंधित बातम्या

Mumbai : दोन महिन्याचं बिल पाहून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तुम्हीही रक्कम पाहू हादराल

Rs 80 crore bill to paddy mill owner; Wrong correction from MSEDCL