एक्झिट पोल येताच संघाचे बडे पदाधिकारी सर्वात आधी 'गडकरी' वाड्यात!

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी (19 मे) पार पडला आणि काही मिनिटातच देशभरातील वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलही जाहीर केले. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असताना, भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्वाच्या नेत्यांनी आज (20 मे) …

एक्झिट पोल येताच संघाचे बडे पदाधिकारी सर्वात आधी 'गडकरी' वाड्यात!

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी (19 मे) पार पडला आणि काही मिनिटातच देशभरातील वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलही जाहीर केले. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असताना, भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्वाच्या नेत्यांनी आज (20 मे) नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीच कैलास विजयवर्गीय यांना नितीन गडकरींना भेटण्यास सांगितल्याची माहिती मिळते आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला बहुमत मिळणार असलं, तरी अनेक एक्झिट पोलनुसार अगदी काठावर एनडीएला मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या मोर्चेबांधणीकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे नितीन गडकरी यांचं आहे. त्यामुळे एक्झिट पोलनंतर भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

दरम्यान,  TV9-CVoter च्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला 128 जागा आणि इतरांना 127 जागा मिळतील. यात एकट्या भाजपला 236 जागांच अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *