राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'हुंकारा'ला हायकोर्टात आव्हान

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात येत्या 25 नोव्हेंबर रोजी हुंकार रॅलीचं आयोजन संघ आणि त्यांच्याशी …

, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘हुंकारा’ला हायकोर्टात आव्हान

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात येत्या 25 नोव्हेंबर रोजी हुंकार रॅलीचं आयोजन संघ आणि त्यांच्याशी निगडीत संघटनांनी केलं आहे.

नागपुरातील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या  प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. जनार्दन मून यांनी या सभेवर विविध आक्षेप घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या वादाचे प्रकरण प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ही सभा आयोजित करणे बेकायदेशीर आहे, असं याचिकेत नमूद करण्यात आलंय.

सोबतच या ठिकाणी एकाच धर्मातील वेगवेगळ्या संघटना एकत्रित येणार  असल्याने त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो, जो मुद्दा न्यायप्रविष्ट आहे त्या मुद्याला धरून अशा प्रकारे सभा होऊ नये अशी मागणी या याचिकेत केली आहे.

देशभरात तीन ठिकाणी हुंकार रॅली होणार आहे. त्यात नागपूर हे संघाचं मुख्यालय असल्याने आणि या रॅलीत संघ आणि निगडित असलेल्या शाखा सहभागी होणार असल्याने या रॅलीला मोठं महत्त्व आहे. कोर्ट या याचिकेवर नेमका काय निर्णय देतं याकडे लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. शिवसेना आणि आरएसएसने यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. त्यामुळे राम मंदिरावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *