“अहंकार नसावा, मी मी करु नये”, संरसंघचालकांचा सल्ला नेमका कुणाला?

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

पुणे : संविधानाचं रक्षण करायचंय असं म्हणत विरोधी पक्ष मोदी सरकारवर टीका करत आहेत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संविधानाचं स्पिरीट लक्षात घेऊन देश चालवावा, असं अवाहन केलंय. अनेक न्यायमूर्ती म्हणतात सोशालिस्ट, सेक्युलर हे शब्द संविधानात नंतर टाकण्यात आले.  मात्र संविधानात अंतर्भूत होतं ते उघडं केलंय. भारताने सर्वांप्रती समान दृष्टिकोन ठेवून अवघं […]

अहंकार नसावा, मी मी करु नये, संरसंघचालकांचा सल्ला नेमका कुणाला?

पुणे : संविधानाचं रक्षण करायचंय असं म्हणत विरोधी पक्ष मोदी सरकारवर टीका करत आहेत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संविधानाचं स्पिरीट लक्षात घेऊन देश चालवावा, असं अवाहन केलंय. अनेक न्यायमूर्ती म्हणतात सोशालिस्ट, सेक्युलर हे शब्द संविधानात नंतर टाकण्यात आले.  मात्र संविधानात अंतर्भूत होतं ते उघडं केलंय. भारताने सर्वांप्रती समान दृष्टिकोन ठेवून अवघं विश्व कुटुंब मानलंय. आताचं संविधान सुद्धा या वृत्तीचं व्यक्त होत असल्याचं सरसंघचालक म्हणाले. अहंकार नसावा, मी मी करु नये, असा सल्लाही मोहन भागवत यांनी दिला.

आमची अवस्था पूर्वी सॉलिड सॉलिड डिपॉझिट जप्त अशी होती. आम्ही इतका मार खाल्ला की सवय तिच होती. चांगले बोलले की चुकल्यासारखं वाटायचं, अशी आठवण सरसंघसाचकांनी सांगितली.

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात मोहन भागवत गीता दर्शन स्मरणिकेचं प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गीताधर्म मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

सरसंघचालकांनी गीतेचं मानवाच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केलं. गीता हा राष्ट्रधर्म असून भारताचं आणि जनतेचं जीवन कसं असावं हे सांगत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे गीतेचा अभ्यास करुन आचरण करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. आदर्श समाजावर राष्ट्र उभं राहत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी सरसंघचालकांनी संविधानाचं महत्त्व विशद केलंय. अनेक न्यायमूर्ती म्हणतात की भारताच्या संविधानात सोशालिस्ट,  सेक्युलर हे शब्द नंतर टाकण्यात आले. संविधानात अंतर्भूत होते ते उघडे केलंय. भारताने सर्वांप्रती समान दृष्टिकोन ठेवून विश्व कुटुंब मानलंय. अशा जीवनाची परंपरा उभी केली. संविधानाचं स्पिरीट लक्षात घेऊन देश चालवावा, असं अवाहन भागवतांनी केलं.

माणसाला अहंकार नसावा, असा सल्ला सरसंघचालकांनी दिला. एखाद्या कामामागे पुष्कळ जण असतात. आपण करतो म्हणून होतं असं नाही. मीच करतो तेच चांगलं. मी मी केलं असं नको, असं आवाहन त्यांनी केलं. पायलट विमान चालवतो, मात्र त्याचा कंट्रोल दुसर्‍याकडे असते असं म्हणत मी केलं तेच चांगलं असा अहंकार नको, असा सल्लाही त्यांनी दिला.

संघ चांगला वाढला त्याला मी एकटा कारणीभूत नाही, तर अनेक जण काम करतात. शाखा वाढवण्यासाठी सगळे जण काम करतात. त्यांना कोणी धन्यवाद म्हणत नाही, असंही मोहन भागवत म्हणाले.

चांगल्या कामासाठी अनेक वेळा वाट पाहायची असते. योग्य संधीची वाट पाहायची असते. अफझलखान चाल करुन आला तरी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड सोडला नाही. उत्साह न दाखवता जाळ्यात सापडण्याची संधी शोधली. त्यानंतर त्यांनी चारही दिशेला दिग्विजय केल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं.

अनुभवातून उत्तम कार्य विकसित होतंय. प्रत्येक कामाची वेळ असते, ती यावी लागते, असं म्हणत त्यांनी आणीबाणीच्या काळात संघाच्या कामाचा आढावा घेतला.

आणीबाणी काळात प्रचारक असताना आणीबाणी लागली. शाखा चालवण्याचा उत्साह मावळला होता. शाखा बंद करुन चोरुन काम सुरु होतं. मात्र निवडणूक जाहीर झाल्यावर काही बदलाची हवा नव्हती. आमची पूर्वी अवस्था सॉलीड सॉलीड डिपॉझीट जप्त. त्या वेळी कोणी सांगितलं असतं असं दिवस येतील तर विश्वास ठेवला नसता, असंही सरसंघचालकांनी सांगितलं.

आम्ही इतका मार खाल्ला की सवय तिच होती. चांगलं चुकल्यासारखं वाटायचं.  मात्र अखेर चिकाटीने बदलल्याचं ते म्हणाले. भारतीयांनी गीता सामान्य माणसापर्यंत पोहोचवली तर आजच्या शंभर पटीने जास्त प्रभावी होऊन भारत विश्वगुरु म्हणून जगापुढे येईल, असं आवाहन सरसंघचालकांनी केलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI