नागपुरात 26 नोव्हेंबरपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू; प्रशासनाची जोरात तयारी

26 नोव्हेंबरपासून नागपुरातील ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत. (Nagpur Schools Open Rural )

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 10:30 AM, 24 Nov 2020
दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता दिल्ली सरकारने आगामी आदेशापर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले आहेत. दिल्ली सरकारने सांगितलं आहे, की विद्यार्थी, पालक, डॉक्टर्स यांच्याकडून सूचना घेतल्यानंतरच शाळा सुरु करण्यात येतील. त्यासाठी नियमावली जाहीर केली जाईल.

नागपूरः जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक शाळेची पाहणी केली जात आहे. 26 नोव्हेंबरपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत. (Rural Schools Open In Nagpur From November 26; Strong Preparation Administration)

शाळा सुरू करण्याबरोबर शाळा प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचं थर्मल स्क्रिनिंग होणार आहे. आतापर्यंत 36 पेक्षा जास्त शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीणमध्ये 9 ते 12 वीला 5576 शिक्षक आहेत. त्या प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 26 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत आहेत. 9 ते 12 वीच्या ग्रामीण भागातल्या या शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जोरात तयारी केलीय. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 9 ते 12 वीच्या प्रत्येक शाळेची पाहणी केली जात असून, शाळेत कोविड नियमांचे पालन कशा प्रकारे करायचं, याची माहिती दिली जातेय. 26 तारखेला विद्यार्थी शाळेत येणार आहेत, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांचं थर्मल स्क्रिनिंग आणि हात सॅनिटाईज करूनच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.(Rural Schools Open In Nagpur From November 26; Strong Preparation Administration)

नागपूर ग्रामीण भागात साधारणतः निम्म्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची साधनं नाहीत, त्यामुळेच 9 वी ते 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळे या पालकांनाची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासन शाळा सुरू करण्याची तयारी करतायत. पण शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश ऐच्छिक असणार आहे, जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांना गैरहजर असल्याची शाळेत नोंद केली जाणार नाही. त्यामुळेच सध्याच्या कोविडच्या काळात ज्यांना गरज आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत शिक्षकांची उपलब्धता करून शाळा सुरू करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत केलं जातंय.

मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा उघडण्याला स्थगिती देण्यात आली आहे. तर सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, उस्मानाबादसह 22 ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 9 वी ते 12 वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. सर्वाधिक 20 शिक्षक कोरोनाबाधित सापडल्यानंतरही श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सॅनिटायझर दिले जात होते, मास्क घालून वि्द्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. राष्ट्रगीत गात आठ महिन्यांनंतर शाळांना सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 481 शाळेत 70 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.


(Rural Schools Open In Nagpur From November 26; Strong Preparation Administration)

संबंधित बातम्या

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह? 

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय