दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे हिंमत नाही, शेट्टींवर सदाभाऊंचा हल्ला

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यात  साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत राहिली नाही, अशी घणाघाती टीका, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याचं टीकास्त्र खोत यांनी सोडलं. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ऊस दरासंदर्भात खोत यांना विचारले असता त्यांनी शेट्टींवरच निशाणा साधला. …

दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे हिंमत नाही, शेट्टींवर सदाभाऊंचा हल्ला

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यात  साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत राहिली नाही, अशी घणाघाती टीका, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याचं टीकास्त्र खोत यांनी सोडलं. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

ऊस दरासंदर्भात खोत यांना विचारले असता त्यांनी शेट्टींवरच निशाणा साधला. शेट्टी यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यावर बोलताना खोत म्हणाले की अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही. वेळ पडल्यास इट का जवाब पथ्थर से देऊ असा प्रति इशारादेखील खोत यांनी राजू शेट्टींना दिला.

त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा संघर्ष आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवली तर हातकणंगले मतदार संघातूनच लढवणार असं पुन्हा एकदा खोत यांनी ठणकावून सांगितलं.

राजू शेट्टी काय म्हणाले होते?

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावा अन्यथा अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. येत्या 24 तारखेला अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती आहे. यापूर्वीच राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला हा इशारा दिला. दरम्यान राजकीय मशागत करून मतांची शेती जरूर करा, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावा असे सुद्धा खासदार शेट्टी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *