टीव्ही 9 मराठी इफेक्ट : हॉस्पिटल नमलं, बाळाचा मृतदेह नातेवाईकांकडे दिला!

नाशिक : ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीमुळे नाशिकमधील साफल्य हॉस्पिटलने नमतं घेतलं आहे. 10 ते 12 तासांपूर्वी संजय अहिरे यांच्या आठ दिवसाच्या बाळाचा गंगापूररोड येथील साफल्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे लगेच बिल देऊ शकत नाही म्हणून डॉक्टरांनी बाळाचा मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. त्यामुळे संजय अहिरे साफल्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना …

टीव्ही 9 मराठी इफेक्ट : हॉस्पिटल नमलं, बाळाचा मृतदेह नातेवाईकांकडे दिला!

नाशिक : ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीमुळे नाशिकमधील साफल्य हॉस्पिटलने नमतं घेतलं आहे. 10 ते 12 तासांपूर्वी संजय अहिरे यांच्या आठ दिवसाच्या बाळाचा गंगापूररोड येथील साफल्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे लगेच बिल देऊ शकत नाही म्हणून डॉक्टरांनी बाळाचा मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. त्यामुळे संजय अहिरे साफल्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना विनवणी करत होते. मात्र, अखेर ‘टीव्ही 9 मराठी’ने या घटनेची दखल घेतल्यनंतर साफल्य हॉस्पिटलने नमतं घेतलं.

नेमकं प्रकरण काय आहे?

आठ दिवसांच्या बाळाचा मृतदेह ताब्यात मिळत नाही म्हणून गेल्या बारा तासांपासून संजय अहिरे डॉक्टरांची विनवणी करत अश्रू ढाळत होते. दोन तारखेला बाळाला श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यांनी आपली परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बाळाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र व्हेंटिलिटर खाली नाही. त्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. शहरातील मेडिकल कॉलेज आणि इतर हॉस्पिटलमध्ये त्यांनी चौकशी केली. मात्र त्यांना काही आधार मिळाला नाही. त्यामुळे मित्राच्या सल्ल्याने त्यांनी गंगापूररोड येथील साफल्य हॉस्पिटलमध्ये दोन तारखेला बाळाला भरती केले. डॉक्टरांनीही उपचार सुरु केले. वारंवार डॉक्टर सांगत होते की बाळाची तब्येतीत सुधारणा होते आहे. मात्र बाळाला त्रास होताच. डॉक्टरांना आम्ही सांगितलं की, आम्हाला खर्च परवडणारा नाही. आम्ही एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला शिफ्ट करतो. हे सांगताच त्याच रात्री 2 वाजता डॉक्टरांनी माहिती दिली की, बाळाचा मृत्यू झाला आहे. हे ऐकताच आई वडिलांना धक्का बसला. मात्र आमच्या बाळाचा मृत्यू हा लवकरच झाला असावा. मात्र पैसे जास्त उकलवण्यासाठी डॉक्टरांनी माहिती उशिरा दिली आणि आमच्या बाळाची हेळसांड केली, असा आरोप वडिलांनी केला आहे.

नाशिकमध्य अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कायमच हेळसांड करत आहेत. अनेक सुविधा फक्त नावाला आहेत. त्यांचा वापर होत नाही. सरकारी योजनांची माहितीही गरिबांना दिली जात नाही.

अखेर ‘टीव्ही 9 मराठी’ने या सर्व प्रकराची दखल घेतली आणि बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर साफल्य हॉस्पिटलने नमतं घेत, बाळाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *