या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे : संभाजी भिडे

या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे : संभाजी भिडे

संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 23, 2021 | 4:04 PM

सांगली : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सांगलीतील एका चौकाचं नामकरणही करण्यात आलं. याचाच संदर्भ घेऊन त्यांनी देशाचंच नामकरण करण्याचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा करण्याचीही मागणी केली (Sambhaji Bhide oppose Bharat name as country demand to rename as Hindustan support Shivsena for cause).

संभाजी भिडे म्हणाले, “आज मोठी आनंदाची गोष्ट आहे. फार विलंब झालेली चांगली गोष्ट आज होतेय. हे नामकरण 25 वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं, ते आज होतंय. जे नामकरण होतंय त्या बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. चौकाचं नामकरण होईल, पण कामाचं काय? या सांगली गावात शिवसेनेच्या 200-250 शाखा का नाहीत? हे दुःख घेऊन आपण जाऊयात. हे दुःख आपण कार्यन्वित करुयात.”

“आज हे नामाकरण होतं असलं तरी खरं नामकरण ते आहे. गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजे. लोकसेवक तत्पर पाहिजे. हा प्रवाह अखंड चालू राहिल पुढे यासाठी खटपट केली पाहिजे.पद, पैसा, स्थान, मोठेपण हे शुल्लक आहे. आपल्याला संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. हे लक्षात ठेऊन काम करुयात. हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकतं असं माझं स्वतःचं मत आहे,” असंही संभाजी भिडे यांनी नमूद केलं.

‘देशाला प्राणवायू इतकीच शिवसेना महत्त्वाची’

संभाजी भिडे म्हणाले, “या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे, तसं या या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे. हे लक्षात घेऊन आपण कामावर तुटून पडूयात. एका चौकाचं नाव काय पण संपूर्ण देशाचं नाव या नावानं ओळखला गेला पाहिजे. इतकी महत्त्वाची आहे शिवसेना. हे माझं राजकीय मत नाही, तर राष्ट्रीय मत आहे.”

हेही वाचा :

रामाच्या फोटोमध्ये मिशा हव्या, लफडेबाजीने सुशांतने आत्महत्या केली असावी : संभाजी भिडे

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी

व्हिडीओ पाहा :

Sambhaji Bhide oppose Bharat name as country demand to rename as Hindustan support Shivsena for cause

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें