संजय राऊतांनी स्वत:ची तपासणी करावी, ते कोणाच्या पोटचे…; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिरसाटांनी उत्तर दिलं आहे. राऊतांनी स्वत:ची तपासणी करावी, असं ते म्हणालेत. वाचा सविस्तर...
संजय राऊत यांनी आपल्या आई-वडिलांना विचारावं की आपण कोणाच्या पोटचे आहोत… त्यांनी पहिले स्वतःची तपासणी करून घ्यावी. नेमकं आपण कोणाचे आहोत, ये पाहावं. त्यांना लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायला. मराठ्यांच्या पोराबद्दल असे अपशब्द वापरायचे असतील तर हा समाज तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यावर शिरसाटांनी भाष्य केलंय.
संजय राऊतांवर हल्लाबोल
शिवरायांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. म्हणून सरकारला जोडे मारू म्हणणाऱ्या संजय राऊत यांनाच जोडे मारले पाहिजेत. मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे संजय राऊत हे शिवरायांबद्दल बोलत आहेत. शिवरायांचा इतिहास सांगायची त्यांची लायकी नाही. मात्र त्यांना वारंवार राजकारण करायचं आहे. कोणाचे बळी जावो, कोणी मरो. मात्र त्यांना सत्ता हवी आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी ते हापापले आहेत. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
विरोधकांवर हल्लाबोल
लाडकी बहीण योजना आल्यापासून यांच्या मनामध्ये काहूर उठला आहे. महाराष्ट्रातील 50% महिला एका बाजूला गेल्या तर हे कधीच सत्तेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे छोटा असो की मोठा, सगळ्या मुद्द्यावर यांचं राजकारण सुरू आहे. बदलापूर प्रकरणात देखील राजकारण केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा दुर्दैवाने कोसळला आहे. त्यावर राजकारण करू नये. विरोधकांच्या मागण्या काहीच नाहीत. मात्र पुतळा पाडला पुतळा पाडला असे ते म्हणत आहेत. याबाबतीत राजकारण होणं योग्य नाही, असं शिरसाट म्हणाले.
निवडणुकीच्या काळात काय घटना घडत असतात. अजित पवार यांच्या संपर्कात मागेही काही काँग्रेसचे आमदार होते आणि आता उघडपणे काँग्रेसने त्या आमदारावर कारवाई केली. त्यामुळे ते अजित दादा बरोबर जातील. त्यांनी 60 जागा मागितले आहेत. ते महायुतीचे मोठे नेते आहेत. पुढे काय घटना घडणार आहेत तेच सांगू शकतात, असं म्हणत महायुतीतील जागावाटपावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.