मराठा विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रवेशावरुन संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, सुचवला ‘हा’ उपाय

अधिसंख्य जागा तयार करुन राज्यातील एसईबीसी प्रर्वगातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली. (Sambhaji Raje SEBC admission)

मराठा विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रवेशावरुन संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, सुचवला 'हा' उपाय
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 10:19 AM

मुंबई : राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे. कोरोनामुळे शैक्षणिक प्रवेश रखडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिसंख्य ( Super Numerary) जागा तयार करुन राज्यातील एसईबीसी प्रर्वगातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली. (Sambhaji Raje demands to resolve the admission problem of SEBC category students)

“सर्वोच्‍च न्‍यायालयाने SEBC प्रवर्गासाठी शैक्षणिक प्रवेशासाठीच्या 12 टक्के आरक्षणाला स्‍थगिती दिलेली आहे. या स्‍थगिती आदेशाच्‍या पार्श्‍वभूमीवर SEBC प्रवर्गातील मुलांच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेशासाठी अधिसंख्य (Super Numerary) जागा निर्माण करून उपाययोजना करण्‍यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. त्यानुसरा जागा तयार कराव्यात ” असं संभाजीराजे म्हणाले.

यापूर्वीही मागणी केली, मात्र अजूनही निर्णय नाही

तसेच, यापूर्वी आपल्यासोबत झालेल्या बैठकीतदेखील ही मागणी केलेली होती. मात्र, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. हा निर्णय घेताना राखीव आणि खुल्‍या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांवर कोणत्‍याही प्रकारचा अन्याय होणार नाही. त्यांचे हक्क हिरावले जाणार नाहीत. या पद्धतीने इयत्‍ता 11 वीच्‍या प्रवेशाचा मुंबई, पुणे, नागपूर या शहरात निर्माण झालेला प्रश्‍न सोडवता येईल. विविध राज्‍यात आर्थिक दुर्बल घटक, ग्रामीण भागातील विद्यार्थी तत्‍वतःच शैक्षणिकदृष्‍ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना न्‍याय देण्‍यासाठी अधिसंख्‍य (Super Numarary Seats) निर्माण करून वेळोवेळी निर्णय घेण्‍यात आलेले आहेत. असेदेखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे.

महाराष्‍ट्र राज्‍याने सन 2019-20 आणि याआधीसुद्धा उच्‍च आणि तंत्रशिक्षण प्रवेशासाठी अधिसंख्‍य जागांची तरतूद केलेली आहे. काश्मिरी विस्‍थापित, पाकव्‍याप्‍त काश्मिर विस्‍थापित, अनिवासी भारतीय, मध्‍य पूर्वेत नोकरी करणारे भारतीय तसेच मॉरिशसमधील मराठी भाषिक पाल्‍यांच्‍या विद्यार्थ्‍यांना प्रवेश देण्यासाठी अधिसंख्‍य जागा निर्माण करून प्रवेशाची तरतूद यापूर्वीही केलेली आहे. असा जूना दाखलाही यावेळी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

तसेच , केंद्र शासनाने केंद्राच्‍या अखत्‍यारितील शिक्षण संस्‍था म्‍हणजे IIT, IIM, IISR इत्‍यादी शिक्षण संस्‍थांमधील प्रवेशासाठी अधिसंख्‍य जागा निर्माण करून प्रवेश दिलेले आहेत. राज्यात काही अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रिया पूर्ण आल्या आहेत. तर काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया अजूनही बाकी आहेत. कोरना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असाधारण स्थिती निर्णाण झाली आहे. त्यामुळे अधिसंख्य (Super Numarary Seats) निर्माण करून SEBC प्रवर्गातील मुलांना न्‍याय देण्यात यावा. तसेच या दृष्टीने शासनाने तातडाने योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

पदवीधर निवडणुकीसाठी माझा फोटो वापरु नका; संभाजीराजेंचा उमेदवारांना इशारा

EWS आरक्षण घेतल्यास SEBC चा लाभ घेता येणार नाही, खासदार संभाजीराजेंचे मराठा युवकांना आवाहन

SEBC उमेदवारांना भरतीत कसं सामावून घेणार? खुलासा करा, संभाजीराजेंचं थेट ऊर्जामंत्र्यांना पत्र

(Sambhaji Raje demands to resolve the admission problem of SEBC category students)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.