Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात नवे ट्विस्ट, जानकर म्हणतात त्यात तथ्य-संभाजी ब्रिगेड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एससी, एसटी, ओबीसी असं जरी नसलं तरी महादेव जानकर म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे. अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात नवे ट्विस्ट, जानकर म्हणतात त्यात तथ्य-संभाजी ब्रिगेड
mahadev jankar
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 21, 2021 | 4:08 PM

औरंगाबाद : माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते!’ या वाक्याची राज्यात सध्या जोरदार चर्चा आहे. कारण जानकरांच्या या वाक्याचे संभाजी ब्रिगेडने समर्थन केले आहे. 30 ते 35 आमदार येऊ द्या, 10 मिनिटांत आरक्षण देतो, ओबीसी-मराठ्यांसह मुस्लिमांनासुद्धा आरक्षण देतो, असे महादेव जानकरांनी परभणीत केले आहे, त्यामुळे राज्यभरातून आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जानकर म्हणतात त्यामध्ये तथ्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एससी, एसटी, ओबीसी असं जरी नसलं तरी महादेव जानकर म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे. मराठा हा शब्द समूह वाचक शब्द आहे. राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध, गुजरात, मराठा असे म्हटले आहे. तर मराठा मांग, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा चांभार, मराठा माळी, मराठा तेली, मराठा कुणबी असं होतं. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले आहे.”बरे झाले देवा कुणबी झालो। नाहीतर दंभेची असतो मेलो”। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला गेला ते मागास होते म्हणून. अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे.

मराठ्यांचा ओबीसीत समावेश केला जावा

हे सर्व बघता स्वातंत्र्योत्तर काळात एससी, एसटीला आरक्षण दिले गेले. ओबीसीला आरक्षण दिले असताना मराठा समाज कुणबी आहे. ओबीसीला पात्र आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश केला जावा. अशा भूमिका आणि मागणी ही भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केली होती. परंतु काही मराठ्यांच अज्ञान असल्यामुळे आम्ही मागास नाही अशी अज्ञानापोटी भूमिका घेतली होती तर कुणबी, मराठा, देशमुख, पाटील असा वाद निर्माण करून जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडची सुरुवातीपासूनची मागणी आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केला जावा. कारण विदर्भ, खानदेश आणि कोकणात कुणबी म्हणून आरक्षण मिळालेच आहे. हे सर्व बांधव आहेत. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश समावेश हा मराठा समाजाचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून या राज्यात या देशात सामाजिक समता प्रस्थापित करावी ही आमची भूमिका आणि मागणी आहे. अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

Nagpur Cool | बाप्पाला भरली हुडहुडी!, शॉल, टोपरे घातले; गाभाऱ्यात का करण्यात आली हिटरची व्यवस्था?

Special News| बळीच्या राज्यात मजुरांचा ‘बळी’, गावाबाहेर गेल्यास बहिष्कृत करणार; नाशिकमधल्या तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा

KMC Election Result 2021: पश्चिम बंगालमध्ये ‘दीदीगिरी’ कायम, कोलकाता महापालिकेत टीएमसीचा दणदणीत विजय; भाजपचा सुपडा साफ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें