VIDEO: वाटेत नदी लागली, ताफा थांबवून संभाजीराजेंचा नदीत सूर

  • विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 11:08 AM, 15 Apr 2019

कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड तालुका दौऱ्यावर असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रोजच्या धकाधुकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून, पोहण्याचा आनंद लुटला. संभाजीराजेंच्या गाड्यांचा ताफा ढोलगरवाडीतून जात होता. त्यावेळी वाटेत नदी आली. या नदीत शाळकरी मुलं पोहत होती. उन्हाच्या कडाक्या अंगाची लाही लाही होत असताना, संभाजीराजेंनी पोहणाऱ्या मुलांना पाहून गाडी थांबवली. नदीकाठी राजेंनी मुलांशी गप्पा मारल्या. त्यानंतर राजेंनी थेट नदीत सूर मारुन उपस्थितांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

राजघराण्यातील व्यक्ती मनमोकळेपणाने नदीमध्ये पोहत असल्याने पोहणाऱ्या तरुणांना उत्साहाचे भरते आले. अनेकांनी यावेळी सेल्फी घेत हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपला.

संभाजीराजेंनीही आपल्या पोहण्याचं कौशल्य मुलांना दाखवलं. थंडगार, स्वच्छ पाण्यात संभाजीराजेंनी भर उन्हात नदीत सूर मारुन घेतलेल्या आनंदाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.