समीर खान यांच्या अटकेनंतर बडे खुलासे, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार?

समीर खान यांच्या अटकेनंतर बडे खुलासे, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार?

करण सजनानीतर्फे चालवल्या जात असलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये समीर खान अ‌ॅक्टिव्ह पार्टनर असल्याचेही सांगितले जात आहे. (Samir khan Karan Sajnani)

prajwal dhage

|

Jan 14, 2021 | 4:03 PM

मुंबई : समीर खान (Samir Khan) यांना अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. करण सजनानीच्या (Karan Sajnani) ड्रग्ज कार्टेलमध्ये समीर खान यांनी पैसे गुंतविल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, सजनानीतर्फे चालवल्या जात असलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये समीर खान अ‌ॅक्टिव्ह पार्टनर असल्याचेही सांगितले जात आहे. एनसीबीने केलेल्या तपासात ही माहिती समोर आल्यामुळे नवाब मलिक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Samir khan is active partner in drug smuggling of Karan Sajnani)

एनसीबीने मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथल्या एका कुरिअरकडून गांजा ताब्यात घेतला होता. यानंतर पुढच्या कारवाईमध्ये खार इथल्या करण सजनानी यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळीच तपासादरम्यान वांद्रे इथल्या रहिवासी समीर खानचं नाव समोर आलं. समीर खान हे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत. त्यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. त्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. समीर खान यांचा ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठा सहभाग असल्याचा आरोप होतोय. करण सजनानीच्या ड्रग्ज कार्टेलमध्ये समीर खान यांनी पैसे गुंतवले असून सजनानी चालवित असलेल्या ड्रग्ज रॅकेटमद्ये समीर खान हे अ‌ॅक्टिव्ह पार्टनर असल्याचेही सांगितले जात आहे.

समीर खान रडारवर का?

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पेद्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी करण सजनानी याला 20 हजार रुपये गुगल पेद्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे.

कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो : नवाब मलिक

जावई समीर खानला अटक झाल्यानंतर अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास आहे,” असे नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, एनसीबी या प्रकरणावर तपास करत असून आगामी काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधितब बातम्या :

ऑनलाईन विक्री, गांजा म्हणजे सेंद्रीय सिगारेट, वाचा धक्कादायक खुलासे आणि मलिक यांच्या जावयाच्या अडचणी

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिक म्हणाले….

Mumbai | नवाब मलिक यांचा जावई समीर खानला अटक, एनसीबी अधिकारी म्हणतात…

(Samir khan is active partner in drug smuggling of Karan Sajnani)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें