माहूर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस, बड्या राजकीय मंडळींचा अप्रत्यक्षपणे सहभाग, प्रशासन ढिम्म

तीर्थक्षेत्र माहूर तालुक्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर रेती माफियानी हैदोस माजवलाय.

माहूर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस, बड्या राजकीय मंडळींचा अप्रत्यक्षपणे सहभाग, प्रशासन ढिम्म
माहूर तालुक्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर रेती माफियानी हैदोस माजवलाय.

नांदेड : तीर्थक्षेत्र माहूर तालुक्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर रेती माफियानी हैदोस माजवलाय. सगळे नियम पायदळी तुडवत पैनगंगा नदीपात्र रेती माफियानी पोखरण्यास सुरुवात केलीय. बड्या राजकीय मंडळींचा या रेतीमाफियात अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये. प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात व्यस्त असल्याने रेतीमाफियां जास्तच सुसाट झाल्याचे चित्र दिसतंय. (Sand Mafiya in Nanded Mahur The Administration is not Taking Action)

पैनगंगा नदी ही मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागाला विभागणारी नदी म्हणून ओळखल्या जाते. याच पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यातील बाजूने साकुर येथे रेती चा शासकीय ठेका घेण्यात आलाय. पण सर्व नियम धब्यावर बसवत इथे रेती उपसा सुरु आहे. बोटी ला परवानगी नसताना 10 बोटी सेक्शन पंप लावून बेसुमार रेतीचा उपसा केला जातोय.

नदीपात्रात नांदेड जिल्ह्याच्या बाजूने पानी असल्याने बोट चे पाइप इकडे टाकून नांदेड जिल्ह्यातील बाजुनेही उपसा केला जातोय. शिवाय जे सी बी ने उपसा करण्याची परवानागी नसताना अनेक जेसीबी ने रेती उपसा केला जातोय. सर्रास हा प्रकार सुरु असतांना प्रशासन मात्र काहीच कारवाई करत नाहीये. दररोज चार ते पाच कोटी रुपयांची रेती नदीपात्रातून काढल्या जात असून सर्वांच्या आशीर्वादाने हा उपसा सुरू असल्याचे सांगितल्या जातेय.

रेती माफियांच्या या हैदोसामुळे माहूर तालुक्यातील लिंबायत गावातील ग्रामस्थांच जगणं मुश्किल बनलंय. रात्रंदिवस बोटी आणि जेसीबीच्या आवाजाने इथले ग्रामस्थ झोपू देखील शकत नाहीयेत. त्यातुन गावकऱ्यांनी तक्रार करूनही यवतमाळ आणि नांदेडचे प्रशासन मात्र कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत.

काही दिवसांपूर्वी याच रेती माफियांनी उमरखेडच्या एका नायब तहसीलदाराला जीवघेणी मारहाण केली होती, त्यातून या रेतीमाफियांची या भागात दहशत पसरलीय.अमरावती आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होतेय.

(Sand Mafiya in Nanded Mahur The Administration is not Taking Action)

हे ही वाचा :

टिंडरवर सुंदर महिलेचा मोह महागात पडला, गळ्यावर चाकू ठेवत 55 लाख रुपयांची लूट

VIDEO | टाळाटाळ केल्याचा मनात राग, प्रेयसीला ढकललं रेल्वेखाली, थरार सीसीटीव्हीत कैद

Published On - 6:35 am, Mon, 22 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI