महिला काँग्रेस पदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती, सोनिया गांधींकडून प्रसिद्ध पत्रक जारी

सोनिया गांधी यांच्या आदेशने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून यासाठी एक प्रसिध्दी पत्रकही जारी करण्यात आलं आहे.

महिला काँग्रेस पदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती, सोनिया गांधींकडून प्रसिद्ध पत्रक जारी

मुंबई : आगामी पालिका निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात आता सत्ताधारी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. यासाठी, काँग्रेसने महिला काँग्रेस पदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती केली आहे. सोनिया गांधी यांच्या आदेशने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून यासाठी एक प्रसिध्दी पत्रकही जारी करण्यात आलं आहे. (Sandhya Swalakhe Appointed as a Maharashtra Mahila Congress Sonia Gandhi)

खरंतर, काँग्रेसमध्ये ही एक नियुक्ती झाली असली तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. वडेट्टीवार यांची काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे. वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यास इच्छुक असल्याचं समजतं. परंतु इतर दिग्गजही शर्यतीत असल्याने नव्या वारसदाराच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

नाना पटोलेही शर्यतीत

दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बदलण्यास राष्ट्रवादीला कुठलीही हरकत नसल्याचं समजतं. राज्यात सरकारला पूर्ण बहुमत आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले थोरातांच्या ऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यताही बळावली आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईचा फॉर्म्युला वापरणार?

काँग्रेसमधील अनेक बडे नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाची संधी एकाच नेत्याला मिळाल्यानंतर इतर नेते नाराज होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसकडून आता ‘मुंबई मॉडेल’चा वापर करून या नेत्यांची समजूत काढली जाऊ शकते. या फॉर्म्युलानुसार प्रदेशाध्यक्ष न होऊ शकलेल्या नेत्यांकडे इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. (Sandhya Swalakhe Appointed as a Maharashtra Mahila Congress Sonia Gandhi)

संबंधित बातम्या – 

प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्यास नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

(Sandhya Swalakhe Appointed as a Maharashtra Mahila Congress Sonia Gandhi)

Published On - 7:20 pm, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI