सांगलीचे खासदार संजय काका पाटलांचा पत्ता यावेळी कट?

सांगली : या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक संभाव्य उमेदवाराच्या मनात धाकधूक कायम आहे. त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार संजय (काका) पाटील यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. त्याचं कारण म्हणजे संजय काकांच्या उमेदवारीला भाजपमधूनच असलेला विरोध. संजय (काका) पाटील यांनी 2014 च्या […]

सांगलीचे खासदार संजय काका पाटलांचा पत्ता यावेळी कट?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

सांगली : या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक संभाव्य उमेदवाराच्या मनात धाकधूक कायम आहे. त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार संजय (काका) पाटील यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. त्याचं कारण म्हणजे संजय काकांच्या उमेदवारीला भाजपमधूनच असलेला विरोध.

संजय (काका) पाटील यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रतिक पाटील यांचा विक्रमी सव्वा दोन लाख मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या संजय काका यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उघड मदत केली होती. खासदार झाल्यानंतर विकासकामे आणि जनसंपर्क या संजय काकांच्या जमेच्या बाजू असल्या तरी, संजय काका यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असलेली जवळीक ही भाजप आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना खटकत होती. त्यातच संजय काका यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद आणि मंत्रीपदाचा दर्जा दिला. मात्र जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना मंत्री पद दिलं नाही. त्यामुळे नाराजी आहे.

सांगली जिल्ह्यातील भाजपचे आमदार, भाजप जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी संजय काका यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. पक्ष श्रेष्ठींकडे आपलं म्हणणं मांडल्याचीही माहिती आहे. त्यामुळे सांगलीतला उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी सांगलीत भाजपची डोकेदुखी वाढू शकते.

या मतदारसंघांमध्येही उमेदवार बदलण्याची शक्यता

सोलापूर

सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातंय. कारण त्यांच्या मतदारसंघात विकासकामांची बोंब असल्याचा आरोप आहे. शिवाय खासदार निवडणुकीनंतर पुन्हा फिरकले नसल्याचाही आरोप होतोय. त्यामुळे भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात आहे.

वर्धा

वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांचंही तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सागर मेघे 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढले होते.

अहमदनगर

भाजपने यावेळी दिलीप गांधींऐवजी ऐनवेळी भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखेंना तिकीट देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अहमदनगरमध्ये नवख्या उमेदवाराला संधी मिळणार आहे.

पुणे

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनाही यावेळी तिकीट न दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी गिरीश बापट यांचं नाव चर्चेत होतं. पण बापटांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलंय.

नांदेड

मोदी लाटेतही काँग्रेसने नांदेडची जागा जिंकली होती. पण यावेळी खासदार अशोक चव्हाण यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.