अंगाणात झोपलेल्या महिलांवर शेजारची भिंत कोसळली, तिघींचा मृत्यू

सांगली: शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मोही इथे बुधवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. सोनाबाई खंदारे (50), कमल जाधव (50), हौसाबाई खंदारे (80) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर या घटनेमध्ये अन्य दोन जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ …

अंगाणात झोपलेल्या महिलांवर शेजारची भिंत कोसळली, तिघींचा मृत्यू

सांगली: शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मोही इथे बुधवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली.

सोनाबाई खंदारे (50), कमल जाधव (50), हौसाबाई खंदारे (80) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर या घटनेमध्ये अन्य दोन जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे या तिघीही अंगणात झोपल्या होत्या. शेजारच्या घराच्या भिंतीकडे डोके ठेवून या तिघीही झोपल्या होत्या. मात्र मध्यरात्री कपाऊंडच्या भिंतीचा मलबा तिघींच्या डोक्यावर कोसळला. त्यामुळे काही कळण्यापूर्वीच या तिघींचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *